माऊलींनी संजीवन समाधीनंतर ‘या’ संतांना दिलं होत साक्षात दर्शन


श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात | सांगितली मात मजलागी |

संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर श्री संत शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांना साक्षात दर्शन दिले होते. याबाबत नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे. तसेच याबाबत नाथ बाबांचा एक अभंग देखील आहे. 

याबाबत ची माहिती अशी आहे की, एकदा नाथ महाराजांचा घसा सूजून दुखायाला लागला. अनेक उपचार केले पण त्यांना बरं वाटत नव्हतं. तीन दिवस त्यांना झोप देखील लागली न्हवती. तीन दिवसानंतर जेंव्हा त्यांना झोप लागली तेंव्हा त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नात माऊली आले होते. 

माऊलींनी नाथ महाराजांना सांगिलतलं की, तुमच्या घशाची सूज बरी होईल. त्यासाठी तुम्हाला आळंदीला यावं लागेल. माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागली आहे. आळंदीला येऊन ती दुर करावी.

त्यानंतर नाथ माहाराज आळंदीला आले. नंदीला बाजूला सारून नाथ बाबा आत गेले. माऊली समाधी अवस्थेत बसले होते. नाथ बाबांनी गळ्याला लागलेली मुळी दुर केली. त्यानंतर ३ दिवस नाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजाजवळ होते.

नाथ माहराज तीन दिवसानंतर बाहेर आले. त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. सोबतच्यांनी डोळ्यात पाणी येण्याचं कारण विचारल्यावर नाथ बाबा म्हणाले, 

श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात | सांगितली मात मजलागी |

 माउलींच वर्णन करताना नाथ महाराज म्हणाले, 

दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा | परब्रम्ह केवळ बोलतसे….
थोडे नवीन जरा जुने