पायांना स्वच्छ आणि सुंदर बनवतात हे घरगुती उपाय !


असं म्हणतात की, जे लोक आपले पाय स्वच्छ ठेवतात त्यांचे विविध प्रकारच्या आजारांपासून रक्षण होते. डॉक्टरांच्या मतानुसार पाय आणि टाचा स्वच्छ ठेवणे तेवढेच आवश्यक जेवढी आपण संपूर्ण शरीराची स्वच्छता ठेवतो. 

यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीने दररोज पाय स्वच्छ करण्यासाठी 10 मिनिटांचा वेळ अवश्य काढावा. आज आम्ही तुम्हाला पाय स्वच्छ करण्याचे काही खास घरगुती उपाय सांगत आहोत.

1. संत्र्याच्या रसामध्ये भरपूर व्हिटॅमिन असते. जर तुमचे पाय उन्हामुळे भाजले असतील तर त्यावर संत्र्याचा रस लावा. 15 मिनिटांनी पाय पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

2. पाय स्वच्छ करण्यासाठी खडेमीठ वापरावे. या मिठाने हळूहळू पायांना मसाज केल्यास पाय स्वच्छ होतील.

3. पाय ओले करून थोडीशी साखर 10 मिनिट पायांवर रगडा. त्यानंतर पाय गरम पाण्यामध्ये थोडावेळ बुडवून ठेवा.

4. जर तुम्ही टाचांच्या भेगांमुळे त्रस्त असाल तर त्यावर लिंबू रगडा. त्याचबरोबर कोमट पाण्यामध्ये एक ताजे लिंबू पिळून त्यामध्ये 20 मिनिट पाय बुडवून ठेवा. त्यानंतर स्क्रब करून घ्या.

5. ज्या लोकांच्या पायाला जास्त घाम येत असेल त्यांनी पाण्यामध्ये व्हिनेगर टाकून पाय बुडवून ठेवावेत. 10 मिनिटांनी पाय स्वच्छ धुवून घ्यावेत.

6. स्नानासाठी वापरण्यात येणाऱ्या शॅम्पूच्या फेसाने तुम्ही पायाचा टाचा स्वच्छ करू शकता.
थोडे नवीन जरा जुने