रसरशीत द्राक्ष आहे अनेक विकारांवर रामबाण उपाय !


हिरव्या आणि काळ्या रंगाची टपोरी द्राक्ष पाहिली की कुणालाच द्राक्ष खाण्याचा आवरत नाही. द्राक्ष चवीला जितकी रसाळ आमि मधुर असतात तितकीच ती शरीरासाठी देखील गुणकारी आहे. शरीराला त्वरीत उर्जा देणारी द्राक्ष अनेक विकारांवर रामबाण उपाय आहेत.

द्राक्ष आरोग्यास खूप फायदेशीर असतात. प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, सोडियम, फाइबर, विटामिन ए, सी, ई, कॅल्शियम, लोह इत्यादी अनेक पोषक घटक द्राक्षामधून शरीराला मिळतात.

द्राक्ष खाल्याने पोटाचे आजार कमी होतात. बद्धकोष्टतेवर द्राक्ष हा रामबाण उपाय आहे. उलटी होत असल्यास द्राक्षावर काळी मिरी आणि मीठ टाकून खाल्यास उलटी थांबते.

मायग्रेनच्या त्रासालाही द्राक्ष अतिशय उत्तम औषध आहे. डोकं दुखत असेल तर द्राक्षांचा रस प्यावा, त्याने लगेचच आराम वाटतो. द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असल्याने रक्तवाढीसही त्याची मदत होते. त्याचप्रमाणे अंगदुखी, सांधे दुखीवरही द्राक्ष औषधी आहे.
थोडे नवीन जरा जुने