स्वस्थ जीवनशैली साठी रोज चाला इतकी पावले...


आपण सर्वांनी ऐकला आहे की स्वस्थ जीवनशैली साठी रोज १० हजार पावले चालणे गरजेचं आहे. परंतु असे करणे खरंच आरोग्यासाठी चांगलं आहे का?

भले ही स्वस्थ राहण्यासाठी १० हजार पावले ही संख्या मानत आहे परंतु नुकत्याच अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की अवेळी मृत्यू ची जोखीम कमी करण्यासाठी याच्या अर्धी जरी पाऊले चालणे देखील पुरेसे आहे.

१० हजार पाऊले चालणे गरजेचे नाही: अभ्यासाअंती हे स्पष्ट झाले आहे की एक व्यक्ती हया दैनंदिन मानकाच्या अर्धी संख्या चालून सुद्धा स्वस्थ जीवन जगू शकतो मैसाचुसेट्सच्या बोस्टन मधील ब्रिघम इंड वुमेन्स हॉस्पिटल च्या संशोधकांच्या अभ्यासाअंती हे स्पष्ट झाले की एक वृद्ध महिला एका दिवसात ४४०० पाऊले चालून अकाली मृत्यू च्या धोक्यातून स्वतःला सुरक्षित केले. 


संशोधकांच्यामते हा निष्कर्ष त्या लोकांना खूप प्रो्साहन देईल जे कमी चालू इच्छितात. एक संख्या म्हणून तुम्ही दिवसभरात १० हजार पाऊले चालू शकता ज्यात वेगवेगळ्या क्रिया समाविष्ट असतील जसे की लिफ्ट च्या ऐवजी पायऱ्या चढने, मुलांना शाळेत सोडणे आणि घेऊन येणे, थोडेसे अंतर पायीपायी चालणे इत्यादी. या सर्व क्रियांमुळे पाऊले चालण्याची संख्या वाढू शकते.

अभ्यासात प्रत्येक दिवसाच्या पाऊलांची केली गणना: जे.ए.एम.ए. आंतरराष्टरीय औषधामध्ये प्रकाशित अभ्यासानुसार संघाने चार वर्षापर्यंत ६२ ते १०१ वयवर्षाच्या १६७०० महिलांचा अभ्यास केला. या सर्व सहभागी महिलांच्या पाऊलांची गणना त्यांनी एका अंगात घालता येण्यासारख्या उपकरणा मार्फत केली. यानंतर संशोधकांना हे समजले की १० हजार पाऊलांची संख्या अर्धी होऊनही वृद्ध महिलांच्या अकाली मृत्यू चा धोका कमी होता. एका दिवसात २७०० पाऊले चालणाऱ्या महिलांच्या तुलनेत ४४०० पाऊले चालणाऱ्या महिलांच्या अकाली मृत्यू चा धोका कमी होता. याचसोबत ७५०० पेक्षा जास्त पाऊले चालणाऱ्या मध्ये मृत्युदर कमी आहे हे निरीक्षणात आले.

हार्वर्ड टी एच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये एपिडेमिओलोजी विभागातील शिक्षक डॉ.आई मिन ली यांचं म्हणणं आहे की एका दिवसात १० हजार पाऊले चालणे अवघड वाटू शकते परंतु आमच्या निरीक्षणात अस आला की वृद्ध महिलांच्या पाऊलांची संख्या जशी वाढली तसा मृत्युदर खूप कमी झाला आहे. 

जुन्या मार्गदर्शनानुसार एका वयस्कर व्यक्तीने दररोज १० मिनिट रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढविणारा व्यायाम करणे गरजेचे आहे, परंतु वर्तमानात लोकांचा अस म्हणणं आहे की कोणतीही शारारिक क्रिया व्यक्तीला स्वस्थ ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावते. 

प्रोफेसर ली यांच्यामते हा निष्कर्ष त्या लोकांना खूप प्रोत्साहित करेल ज्यांना अस वाटत की १०००० पाऊले दिवसाचे चालणे खूप अवघड आहे.
थोडे नवीन जरा जुने