मुलांचे आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी करा 'हे' नैसर्गिक उपाय !


सध्याच्या काळात प्रत्येक आई-वडिलांसाठी मुलांचे आरोग्य चिंतेचा विषय बनत चालला आहे. याच कारणामुळे मुलांना वारंवार डॉक्टरकडे घेऊन जावे लागते. 

यामागचे मुख्य कारण म्हणजे आपण नैसर्गिक खाद्यपदार्थांकडे दुर्लक्ष करून कृत्रिम औषधांच्या मदतीने मुलांना निरोगी, ताकदवान आणि तल्लख बुद्धीचा करण्याचा विचारात राहतो. परंतु आपण हे विसरून जातो की, रसायनांच्या घातक प्रभावाला मुलांनाच सामोरे जावे लागते. 

आज आम्ही तुम्हाला अशा काही नैसर्गिक उपायांची माहिती देत आहोत, ज्यामुळे तुमच्या मुलाचे आरोग्य ठणठणीत राहील.

1. गुजरातच्या डाँग आदिवासी जाणकारांच्या माहितीनुसार, मुलांना दररोज सकाळ-संध्याकाळ द्राक्षचा 4-4 चमचे रस दिल्यास स्मरणशक्ती वाढते तसेच मुलांची तब्येतही चांगली राहते.

2. मुलांना भाजलेले फुटणे चांगल्या प्रकारे चावून-चावून खाण्याचा सल्ला द्या. त्यानंतर 1-2 चमचे मधाचे सेवन करावे. या उपायाने शरीर उर्जावान आणि ताकदवान होईल.


3. भेंडीच्या बिया वाळवून चूर्ण तयार करून घ्या. हे चूर्ण दररोज थोड्या प्रमाणात मुलांना खाऊ घाला. या बिया प्रोटीनयुक्त, गुणकारी आणि शक्तिवर्धक असतात. याच्या नियमित सेवनाने मुलांची तब्येत चांगली बनू शकते.


4. पाताळकोट येथील आदिवासी मुलांच्या शारीरिक विकासासाठी चवळी आणि पालकाची भाजी खाण्याचा सल्ला देतात. यांच्यानुसार या भाज्या अत्यंत गुणकारी असण्यासोबतच शरीराला शक्ती प्रदान करतात.


5. कांदा आणि गुळाचे सेवन करण्याचा सल्ला गुजरातमधील डाँग आदिवासी देतात. यांच्यानुसार मुलांना दररोजच्या जेवणासोबत कांदा आणि गुळ दिल्यास ते ताकदवान होतात.
थोडे नवीन जरा जुने