तंबाखू खाण्याची सवय सोडायची असेल तर मग हे नक्की वाचा !

तंबाखू हा एक उत्तेजक पदार्थ आहे. यात निकोटीन हा उत्तेजित करणारा घटक असतो. उत्तेजित घटक म्हणजे हा घटक रक्तात मिसळतो आणि त्यातून मेंदूमध्ये एका प्रकारची झिंग तयार करतो. 


म्हणून तंबाखू खाणे ही एकप्रकारचे व्यसनच आहे. तसेच सारखी तोंडात धरून ठेवल्याने तोंडाचा कॅन्सर देखील होऊ शकतो.

तंबाखू सोडण्यासाठी उपाय:


आधी मनाचा दृढ निश्चय करा,अचानक तंबाखू सोडायचा विचार करू नका, टप्प्याटप्प्याने हळू हळू कमी तंबाखू खाणे कमी करा.


तंबाखूऐवजी जेष्ठमधाचे तुकडे खिशात ठेवा. जेव्हा तंबाखू खायची इच्छा होईल तेव्हा जेष्ठमधाची काडी तोंडात टाका. जेष्ठमध चवीलाही चांगले असते.

सिगरेटी, पान आणि ज़र्दा लवकर मिळतील अशा ठेवू नका. सिगरेटी, पान आणि ज़र्दा अशा जागी ठेवा जेथून तुम्हाला काढणे वा सापडणे अवघड पडेल.

धूम्रपान करण्यासाठी प्रेरीत करणा-या कारणांना ओळखा किंवा त्या ऐवजी पान खा / जर्दा खा आणि दुसरे उपाय शोधा.

तुमचा कंपू किंवा गट, सिगरेटी, पान, ज़र्दा खातो कां ? असे असल्यास पहिल्यांदा त्यांना टाळायचा प्रयत्न करा किंवा ते जेव्हा, सिगरेटी, पान, ज़र्दा खात असतील तेव्हा त्यांच्या पासून दूर व्हा.

तोंडात च्‍यूइंगम, चॉकलेट, पे‍परमिंट, लॉज़ेंजेस ठेवण्याचा प्रयत्न करा व दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा.

जेव्हा तल्लफ येईल तेव्हा, उभ्याने किंवा बसलेल्या अवस्थेत दीर्घ श्वास घ्या. एक पेला पाणी प्या आणि व्यायामाने देखील तल्लफ घालवण्यास मदत होते.

जेव्हा तंबाखू सेवनाची तल्लफ येईल तेव्हा, तुमच्या मुलांबद्दल आणि त्यांच्या भवितव्याबद्दल विचार करा व तुमच्यावर तंबाखूमुळे होणा-या भयंकर रोगांचा विचार करा.

तंबाखू सोडण्यासाठी अनेक घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. प्रामुख्याने तुम्हांला इच्छाशक्तीची गरज असते. जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही तंबाखूच्या व्यसनापासून दूर जाऊ शकता.

तंबाखूचं व्यसन सोडायचं असेल तर ओव्यासोबत लिंबाचा रस मिसळून त्यामध्ये काळं मीठ मिसळा. हे मिश्रण दोन दिवस ठेवल्यानंतर जेव्हा तंबाखू खाण्याची इच्छा होईल तेव्हा हे मिश्रण खावे.

बडीशेपाची भरड आणि खडीसाखरेचे मिश्रण बनवा. हे मिश्रण हळूहळू चघळा. यामुळे तंबाखू खाण्याच्या इच्छेवर मात करणं सुकर होते.

तंबाखू खाल्ल्याने कॅन्सरचा धोका असतो सोबतच दात कमजोर होतात, त्यावर काळे डाग पडतात,तुमचे वेळा-पत्रक सिगरेट, पान, ज़र्दा सोडून आखा.
थोडे नवीन जरा जुने