एरोमॅटिक थेरपी म्हणजे काय? जाणून घ्या, फायदे आणि उपाय !आरोग्य सुधारण्यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा वापर केला जातो. यापैकी एक पद्धती आहे एरोमॅटिक थेरपी. या थेरपीत व्यक्तीला खास फुलांच्या इसेन्शियल ऑइलचा सुगंध दिला जातो. या सुगंधाने व्यक्तीमध्ये वेगाने सुधार होतो.

8 वेगवेगळ्या सुगंधांचा वापर एरोमॅटिक थेरपीत केला जातो.1907 पासून जगात एरोमॅटिक थेरपीची सुरुवात झाली आहे.


चमेली

झोप न येण्याचा त्रास होत असलेल्या व्यक्तींना चमेलीच्या वासाचा जास्त फायदा होतो. चमेलीच्या वासाने शरीराला आराम मिळतो. मेंदूच्या पेशींना आराम वाटू लागतो आणि व्यक्तीला शांतपणे झोप येते.

काय करावे?: खोलीत चमेलीचा वास असणारी अगरबत्ती किंवा मेणबत्ती लावावी.


पुदिना

पुदिन्याचा वास घेतल्याने मेंदू योग्य पद्धतीने काम करतो. पुदिना चावून किंवा हातावर चोळून याचा सुगंध घेतल्याने स्मरणशक्ती वाढते. तसेच यामुळे दुखणेदेखील कमी होते आणि गारवा मिळतो.

काय करावे? : व्यायाम करण्यापूर्वी पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब हातावर टाकून चोळा. असे केल्याने व्यायाम करताना जास्त उत्साह वाढतो.


दालचिनी

दालचिनीच्या वासाने श्वास मोकळा होतो. व्यक्तीचा अलर्टनेस वाढतो. याच्या वासाने अल्झायमरशी लढण्याची शक्ती मिळते. व्यक्तीला प्रसन्न राहण्यास मदत होते.

काय करावे? : थोडी दालचिनी हातावर रगडा. याचा वास घेणे लाभकारी असते. तसेच दालचिनी चहामध्ये टाकून पिणेदेखील फायद्याचे ठरते.


रोजमेरी

याच्या वासाने एकाग्रता वाढते. सोबत कामाची गती वाढते आणि शुद्धतेतदेखील मोठय़ा प्रमाणात वाढ होते. याच्या वासाने व्यक्ती एखादी गोष्ट लवकर विसरत नाही. लहान-लहान गोष्टी स्मरणात ठेवण्यासाठी मोठी मदत होते.

काय करावे? : आहारात रोजमेरीचा वापर करावा. याच्या वासाचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम पडतो.


लिंबू

आंबट गोड वास तणाव कमी करतो. लिंबू किंवा तत्सम फळांच्या वासाने व्यक्ती तणाव कमी करू शकतो. तणावादरम्यान असा वास अत्यंत गुणकारी ठरतो.

काय करावे? : लिंबू, संत्रा, मोसंबीसारख्या फळांना कापून त्याचा वास घ्यावा. तसेच याच्या साली हातावर रगडल्यानेदेखील वास मिळतो.
थोडे नवीन जरा जुने