तुम्ही रात्रीच्या वेळी जंक फूड खातात? जर असं असेल तर आताच सावधान व्हा...रात्रीच्या वेळी जंक फूड खाल्ल्याने मधुमेह होण्याची शक्यताही बळावत असल्याची माहिती या सर्व्हेतून समोर आली आहे. याशिवायही इतरही अनेक व्याधी जडू शकत असल्याचं या सर्व्हेतून समोर आलं आहे.

तुम्ही जंक फूडचे शौकिन आहात?, तुम्ही रात्रीच्या वेळी जंक फूड खातात? जर असं असेल तर आताच सावधान व्हा... कारण की यामुळे आपल्याला बराच त्रास होऊ शकतो. नुकत्याच केलेल्या एका अहवालानुसार, रात्री जंक फूड आणि स्नॅक्स खाल्ल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या झोपेवर होतो. जंक फूडमुळे तुमची झोप कमी होते. तसंच तुम्हाला लठ्ठपणाही जडू शकतो.

संशोधकांनी 3105 लोकांवर एक फोन-बेस्ड सर्व्हे केला. यात त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. उदा. रात्रीच्या वेळी ते जंक फूड खातात का?, झोप कमी झाल्याने जंक फूड खाण्याची तलफ येते का? यावेळी तब्बल ६० टक्के लोकांनी मान्य केलं आहे की, ते दररोज रात्री जंक फूड खातात. तर दोन तृतीयांश लोकांचं म्हणणं आहे की झोप कमी झाल्याने त्यांना जंक फूड खाण्याचीही तलफ येते.

रात्रीच्या वेळी जंक फूड खाल्ल्याने मधुमेह होण्याची शक्यताही बळावते. असंही या सर्व्हेतून समोर आलं आहे. याशिवाय रात्रीची झोपही कमी होते. तसेच लठ्ठपणा, मधुमेह आणि आरोग्याशी निगडीत अनेक समस्या या सवयीमुळे उद्भवतात.

त्यामुळे आपण कमीत कमी जंक फूड खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याऐवजी ताजी फळे, ज्यूस यासारख्या हेल्दी खाद्यपदार्थांचा आपल्या जेवणात समावेश करायला हवा.
थोडे नवीन जरा जुने