वेळेत काम पूर्ण करण्यासाठी ह्या ट्रिक्स ठरतील खुपच फायदेशीर.ऑफिसात प्रत्येकाला कामाच्या मर्यादेशी झुंजावे लागते. भले प्रेझेंटेशन, डॉक्युमेंट तयार करावयाचे असो वा सोपवलेले काम पूर्ण करावयाचे असो. वेळेत काम करून न दाखवल्यास नोकरी गमावण्यापर्यंत वेळ येते.

व्यवस्थित राहा : जर आपल्या कामाच्या यादीत अनेक मीटिंग व प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या ठरलेल्या तारखा जवळपास असतील तर आपल्याला प्रथम व्यवस्थित होण्याची गरज असते. पद्धत : सर्वप्रथम कालमर्यादांविषयी सांगणारे कॅलेंडर आपल्या जवळ ठेवा. यासाठी आपण मोबाइल एप व ईमेलने कामाच्या कालमर्यादा समजून घेऊ शकता.

काम टाळणे टाळा : ब-याचदा आपण पाहतो की, एखादे काम पूर्ण करून देण्याची ठरलेली तारीख दोन आठवड्यानंतर येणार असेल तर पहिल्या आठवड्यात काम करणे टाळतो. आपल्याकडे भरपूर वेळ आहे तर दुसरे एखादे काम का करू नये असा विचार करतो. आणि शेवटी त्या कामासाठी केवळ दोनच दिवस उरल्याचे लक्षात येते.

पद्धत : आपण काम तुकड्यांत विभागून ते पूर्ण करण्याची वेळ ठरवावी. अशाप्रकारे आपण एक काम करण्याच्या अनेक कालमर्यादा बनवतो आणि मोठे दिसणारे काम सहजतेने पूर्ण होते.

सारे एकट्याने करणे टाळा : हे लक्षात घ्या की, आपल्याला क्वचितच कधी एखादे प्रोजेक्ट एकट्याला पूर्ण करण्यास सांगितले जाते. त्यामुळे इतरांनाही त्यात सामील करा.

पद्धत : स्वत : वर विनाकारण कामाचा दबाव टाकून काहीही होणार नाही.

ऑफिसात सहकर्मचा-यांवरही कामाचा काही भाग सोपवू शकता. जे काम पूर्ण करण्यास ते मदत करू शकतात.

ऐनवेळीच्या अडचणी : कार्यक्षेत्रात अचानक अनेक घटना घडत असतात. उदा. प्रोजेक्टशी संबंधित महत्त्वाची व्यक्ती आजारी पडणे. याकरता आधीच पर्यायी व्यवस्था तयार ठेवा.

पद्धत : जादा काम करण्याची तयारी ठेवा. ठरलेल्या वेळेपूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
थोडे नवीन जरा जुने