"हा" मान केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच आहे - राज ठाकरे


मुंबई : मला हिंदुहृदयसम्राट बोलू नका, हा मान केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच आहे, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्‍या आहेत. मनसेचा ९ फेब्रुवारी रोजी सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ मुंबईत मोर्चा आहे. 

या मोर्चाच्या तयारीच्या दृष्‍टीने रंगशारदा येथे मनसेच्या वरिष्‍ठ पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्‍यात मोर्चाच्या दृष्‍टीने त्‍यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.

वांद्रे येथील रंगशारदा येथे सोमवारी सकाळी ही बैठक झाली. राज ठाकरे हे केवळ दहा मिनिटेच या बैठकीला उपस्थित असल्‍याचे समजते. त्‍यांची तब्‍येत ठीक नसल्‍याने ते जास्‍त काळ या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, असे समजते. 

मनसेचे महाअधिवेशन नुकतेच पार पडले. या महाअधिवेशनात मनसेने हिंदुत्‍वाचा अजेंडा स्‍वीकारला आहे. मनसेने नवा विचार आणि नव्या झेंड्यासह पुन्हा नवीन सुरुवात केली आहे.
थोडे नवीन जरा जुने