गर्भावस्थेमधे माता तणावाखाली असेल,तर बाळाच्या विकासावर देखील होतो परिणाम.


एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, गर्भावस्थेदरम्यान जर माता तणावाखाली असेल, तर त्याचा तिच्या पोटातील बाळाच्या विकासावर परिणाम होतो. 

या संशोधनात असे आढळले आहे की, गरोदरपणाच्या प्राथमिक अवस्थेत मातेला जर टेंशन असेल, तर तिच्या होणा-या बाळाच्या शरीराचा आकार घटतो. न्यू मेक्सिको येथील संशोधकांनी नमूद केले आहे की, २१ सस्तन प्रजातींवर केल्या गेलेल्या ७१९ प्रयोग पाहणीमध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, अशा मुलाच्या जन्मापर्यंत अनेक बदल दिसून येतात. 

ते म्हणतात की, गरोदरपणाच्या अंतिम टप्प्यात जर मातेला तणाव असेल, तर तिच्या पोटातील बाळाला कमी एनर्जी पोचते, ज्यामुळे मुलाची वाढ प्रभावित होते; परंतु नंतर मात्र मुलांना त्रास होत नाही; परंतु गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात जर मातेला तणाव असेल, तर तो मात्र जास्त घातक ठरतो व होणा-या बाळाचे आयुष्यही कमी होते.
थोडे नवीन जरा जुने