आहारात "अशा" पद्धतीने करा गाजराचा समावेश कर्करोगापासून राहाल दूर !


गाजर हे कंदमूळ निसर्गाकडून मनुष्याला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. ते जमिनीखाली येते म्हणूनच ते कंदमूळ या प्रकारात मोडते. 

फळ व भाजी अशा दोन्ही स्वरूपात गाजराचा उपयोग केला जातो. तसेच औषधी वनस्पती म्हणूनही त्याचा वापर केला जातो. संपूर्ण जगात गाजराचे उत्पादन घेतले जाते. भारतातही ते सर्वत्र मिळते. 

गाजराच्या हिरव्या पानातही औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचाही आरोग्य चांगले राखण्यासाठी लाभ होतो. सहसा गाजर हे थंड हवेच्या डोंगराळ प्रदेशात जास्त प्रमाणात उगवते. संस्कृतमध्ये शिखाकंद इंग्रजीमध्ये कॅरट लॅटिनमध्ये डॉक्स कॅरोटा या नावाने परिचित असलेले गाजर अंबेलिमेरी या कुळातील आहे.

गाजर जर आख्खंच नाही तर त्याच्या पानांसकट शिजवलं आणि शिजल्यानंतर त्याची पानं तोडली तर केवळ जास्त प्रमाणात 'अ' जीवनसत्त्वच नाही तर अधिक कर्करोग विरोधी गुणही शरीराला मिळतील.

 ब्रिटमध्ये न्यूकॅसलमधील स्कूल ऑफ अ‍ॅग्रिकल्चर फूड अँड रूरल डेव्हलमेंटच्या द्वारे डॉ. क्रिस्टन बँड यांच्या नेतृत्त्वाखाली केलेल्या एका अध्ययनात सिद्ध झालं की, जर आख्खं गाजर त्याच्या पानांसह शिजवलं गेलं तर कर्करोगविरोधी गुण २५ टक्के अधिक सुरक्षित राहतात आणि त्यांचा गोडवाही वाढतो. 

आणि शरीरात जाऊन 'अ' जीवनसत्त्वात रूपांतरीत होते. याशिवाय गाजरात कर्करोगविरोधी घटक फैलकैरिनॉलध असतं, गाजर जर पानं तोडून आणि चिरून धुतलं, शिजवलं तर त्याचा अधिक भाग पाण्याच्या संपर्कात येतो. 

त्याच्या कोशिका भिंती मऊ पडतात, ज्यामुळे त्यामध्ये असणारं जीवनसत्त्व आणि फैलकैरिनॉल यांसारखे लाभदायक घटक सहज बाहेर येतात किंवा वाहून जातात. 

प्रयोगाद्वारे हे सिद्ध झालं की, गाजर आख्खं आणि पानांसहित शिजवण्याने, उकडण्याने त्याचा नैसर्गिक गोड़वाही वाढतो. संशोधकांच्या मते, हा गोडवा वाढत नाही तर शिजवताना किंवा उकडवताना तो गाजराच्या आत सुरक्षित रहातो. 

जर आपल्यालाही असं वाटत असेल की, गाजरामध्ये असणा-या पौष्टिक घटकांचा पूर्ण फायदा घ्यावा किंवा गोडव्याचा आनंद घ्यावा तर गाजर आख्खं आणि पानांसह शिजवा. अनेकदा आपल्याला बाजारात जी गाजर बघायला मिळतात , ती पानं काढलेली असतात.
थोडे नवीन जरा जुने