'या' घरगुती टिप्सने करा चेहऱ्यावरील अनावश्यक केस दूर.


वैक्सिंग, श्रेडिंग, लेसरद्वारे केस काढून टाकणे असे अनेक उपाय साधारणपणे अवलंबले जातात; पण या उपायांच्या व्यतिरिक्त घरच्याघरी काही उपाय करून चेह-यावरील केस हटविता येऊ शकतात. 

या उपायांच्या अवलंबाने चेह-यावरील केसांची वाढ कमी होऊन कालांतराने संपूर्णपणे बंद होते. 

घरच्या घरी तयार करा फेसपॅक : 
चेह-यावरील केस काढून टाकण्याकरिता एक उत्तम फेस पॅक घरच्याघरी तयार करता येतो. एका भांड्यामध्ये अर्धा कप बेसन, एक लहान चमचा हळद, एक लहान चमचा दुधावरची साय आणि अर्धा कप दूध हे सर्व एकत्र करून त्याची दाट पेस्ट बनवावी. ही पेस्ट चेह-यावर व्यवस्थित लावून घ्यावी. सुमारे अर्धा तास ही पेस्ट चेह-यावर तशीच राहू द्यावी. त्यानंतर ज्या दिशेने केसांची वाढ असेल, त्याच्या विरुद्ध दिशेने चेहरा हळुवार गोलाकार चोळण्यास सुरुवात करावी. 

हा फेस पॅक चेह -यावरून पूर्णपणे काढून टाकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकावा. आठवड्यातून दोन वेळेला या फेस पॅकचा वापर करावा. एका बाऊलमध्ये एक मोठा चमचा पपईचा गर, अर्धा लहान चमचा हळद आणि चार मोठे चमचे अॅलो व्हेरा जेल वापरून पेस्ट तयार करावी. आपल्या चेह- यावर नको असलेल्या केसांची वाढ जिथे आहे, त्या भागावर ही पेस्ट लावून, सुमारे वीस मिनिटे राहू द्यावी. त्यानंतर केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने चोळत पेस्ट चेह-यावरून उतरवून टाकावी व नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा. 

एका मोठ्या लिंबाच्या रसामध्ये एक मोठा चमचा मध मिसळावा. हे मिश्रण वीस ते पंचवीस मिनिटे चेह-याला लावून ठेवावे. या फेस मास्कमुळे चेह-यावरील केसांची वाढ कमी होत जाते आणि कालांतराने संपूर्णपणे थांबून जाते. 

एका मोठ्या लिंबाच्या रसामध्ये एक मोठा चमचा मध मिसळावा. हे मिश्रण वीस ते पंचवीस मिनिटे चेह-याला लावून ठेवावे. या फेस मास्कमुळे चेह-यावरील केसांची वाढ कमी होत जाते आणि कालांतराने संपूर्णपणे थांबून जाते.
थोडे नवीन जरा जुने