दिवसाची सुरुवात आनंदाने करण्यासाठी ह्या ट्रिक्स नक्की फॉलो करा...


असे म्हणतात की , जर सकाळची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवस छान जातो. यासाठी गरज आहे आपणही थोडा प्रयत्न करण्याची.

काही गोष्टींचे पालन करून संपूर्ण दिवसाची उत्तम तयारी करून घेणे चांगले ठरेल. झोपण्यापूर्वी पुढील दिवसाचे शेड्यूलची तयारी अगोदरच करून यावी . उदा. जिमला जायचे असेल तर त्याचे किट रात्रीच व्यवस्थित करून ठेवा. सायकलिंग करावयाचे असेल तर ती रात्रीच ठीकठाक असल्याची खात्री करून घ्या.


पर्सनॅलिटी अँड सोशल ‘ सायकालॉजी बुलेटिन ' रिपोर्टनुसार ज्या व्यक्तींना आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवण्याची सवय नसते त्यांच्यात विनाकारण तणावाची स्थिती जास्त निर्मित होत असते. त्यांना पूर्वीपासूनच थकल्यासारखे वाटू लागते. सकाळी बेडवरून उतरताच शरीराला ' क्विक स्ट्रेच अवश्य द्यावे. कारण ७ - ८ तास झोपेत शरीराचे स्नायू आकसून जातात.

उठल्यानंतर क्विक स्ट्रेच देण्याचा फायदा दिवसभर मिळत राहतो. सकाळी उठल्यानंतर काही वेळानंतर जे पसंत असेल तेच थोडेसे का होईना अवश्य खायला पाहिजे.

याचा संबंध मूडशी असतो. जर आवडता पदार्थ मिळाला तर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम शरीरावर होतो. आवडती वस्तू खाल्ल्यामुळे फील गुड हार्मोन बाहेर पडतात व त्यामुळे मूड ठीक राहतो. 

दिवसभराच्या कामांचा एकदा अवश्य विचार करावा. ज्यामुळे आपले शेड्यूल बनवणे सोपे होईल आणि आपल्या सोयीनुसार कामे वेळेवर पूर्ण करता येतील.
थोडे नवीन जरा जुने