या सर्वाना एक वाक्य एकत्र आणते ते म्हणजे – ‘मी डाएटवर आहे.’ त्यांच्यासाठी थोड..




अनेकांसाठी काबरेहायड्रेट्स हा शब्द त्यांच्या डोक्यात धोक्याची घंटा घणघणून जातो आणि इतरांसाठी फॅट्स हा शब्द भयावह असतो. अनेकांसाठी काबरेहायड्रेट्स हा शब्द त्यांच्या डोक्यात धोक्याची घंटा घणघणून जातो आणि इतरांसाठी फॅट्स हा शब्द भयावह असतो. असेही काही लोक आहेत, जे जेवणाच्या टेबलवर स्वत:ला अनेक गोष्टींपासून लांब ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये असतात. या सर्वाना एक वाक्य एकत्र आणते ते म्हणजे – ‘मी डाएटवर आहे.’

एटकिन्सपासून कार्ब्सपर्यंत, बेयोन्स डाएटपासून ते मास्टर क्लिन्जपर्यंत दरवर्षी अशी काही गोष्ट सेवन करा जी वजन वाढीसाठी ‘क्युअर’ हा शब्द मनावर परिणाम करेल आणि मग तुम्हाला असे अनेक पर्याय मिळतील. बहुतांश लोक व्यवस्थित आकारमान मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या डाएट्सचे सक्तीने अनुकरण करतात, पण असेही काही लोक आहेत की ते खात असलेले अन्नपदार्थ ट्रेंड्सनुसार आहेत हे त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यांद्वारे दाखवले जाण्याची खात्री करून घेतात. यापैकी काही डाएट्स त्यांचे अनुकरण करणारे कमीत कमी कॅलरी इनटेक सहन करू शकतील अशी अपेक्षा करतात, तर बहुतांश डाएट्समध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त आवश्यक अन्नसमूहांना वगळले जाते आणि जवळपास हे सर्वच डाएट्स दररोज शरीर सहन करेल असे नसतात.

आपण अशा वेगळ्या पिढीतले आहोत, ज्यांना तत्काळ आनंदाची मिळेल अशी जबरदस्त इच्छा बाळगतात आणि जर तसे काही सेकंदांमध्ये घडून आले नाही तर ते लगेच दुसरा पर्याय शोधू लागतात. असे अनेकदा होते की लोक यापैकी एक डाएट सुरू करतात आणि त्यांचे वजन काही तासांमध्येच घटेल अशी त्यांची अपेक्षा असते.

तेच पाऊंड्स जे अनेक महिन्यांच्या असक्रियतेमुळे आणि मेदयुक्त आहारामुळे वाढलेले असतात, त्यांना काही क्षणातच आपण बारीक व्हावं अशी अपेक्षा असते. अशा प्रकारच्या अधिकाधिक अवास्तव असलेल्या अपेक्षांमुळे तुम्ही अशा लोकांमध्ये सहभागी होतात, जे सतत डाएट बदलत राहून सर्वोत्तम डाएटच्या शोधात असतात. ते सर्व घटणा-या किलोंबद्दल ऐकत असतात, पण असे थोडे लोक असतात की शरीराला कष्टदेखील द्यावे लागतात, याची त्यांना जाण असते. इतिहासामध्ये आपले शरीर अतिशय प्रगत स्वरूपाच्या चल प्रयोगशाळांपैकी एक आहे, पण ते अतिशय नाजूक आणि अंशत: समतोलाने बांधलेले असतात. दिवसाअखेर या सर्व घटकांच्या सक्रिय कार्यामुळे आपल्याला जीवन जगण्याची अनुभूती मिळते.

यापैकी एकही महत्त्वपूर्ण आणि अत्यावश्यक घटक जरी अनुपस्थित असला तरी त्यामुळे दुस-या घटकाच्या अस्तित्वावर मर्यादा येऊ शकते आणि शरीरात कल्लोळ माजतो. अशी काही उदाहरणे आहेत ज्यामध्ये डाएटचे अनुकरण करणारे लोक इ. आरमध्ये परिणामित होतात. कुपोषणाची उदाहरणे, हायपरप्रोटेमियाची उदाहरणे आणि कोणतीही गोष्ट अतिशय कमी प्रमाणात असणेदेखील गंभीर समस्येला कारणीभूत ठरू शकते.

न्यू यॉर्कमधल्या प्रख्यात काडयोलॉजिस्टनी एक विवादात्मक ट्रेंड सुरू केला, ज्यामध्ये ऊर्जेचा स्रोत केवळ फॅट्स आणि प्रोटिन्स असण्यावर भर देण्यात आला. त्यांच्या मृत्यूनंतर अशी शिकवण मिळाली की डॉक्टर स्वत: ७३ वर्षापर्यंत हृदयरोगाने अ‍ॅटॅकने पीडित होते. अशा प्रकारचा ढोंगीपणा या ट्रेंड्समध्ये अनेकदा पाहायला मिळतो.

काही वर्षापूर्वी सिरीयल डाएटर्सवर अभ्यास घेण्यात आला असून या वास्तविकतेला अधोरेखीत करण्यात आले. सहभाग्यांना असा सबळ विश्वास होता आणि जास्तीत जास्त शक्यता होती की या डाएट्सचे अनुसरण करणे जास्त असते जर ते अधिक क्रांतिकारी असतील. अशा अभ्यासातून असा रोचक अनुमान काढण्यात आला की काही लोक अशा प्रकारच्या डाएट्सचे अतिप्रमाणात अनुसरून स्वत:ला शिक्षा करून घेतात आणि स्थूलपणावर पस्तावतात. मानवी शरीर आणि सौष्ठव दोन्ही बाबी एकमेकांशी अतिशय जवळून निगडित असतात आणि त्यांचे एकमेकांवर अतिशय खोलवर परिणाम होतात.

तुमच्यासाठी काय चांगले आहे हे जाणून घेण्याची सर्वात उत्तम पद्धत म्हणजे तुमच्या शरीराशी संवाद साधणे होय. प्रत्येक पेशी तुमच्याशी संवाद साधते; तुम्ही ते ऐकणे महत्त्वाचे आहे. एक आदर्श डाएट तुमच्या सर्व अन्नगटांची माफक प्रमाणात शाश्वती देतो. त्यात ताजे अन्नपदार्थ असतात आणि ते पॅकेज स्वरूपात असावेत अशी आवश्यकता नसते. म्हणजे हा आहार घेतल्यावर तुम्ही समाधानाने झोपी जाणं तुमच्या हितासाठी योग्य आहे. त्यामुळे पुढे जेव्हा तुम्ही स्वत:वर एखादे जेवणाचे नियोजन लादाल तेव्हा तुम्ही पुढच्या फसव्या दिवसांबद्दल विचार करा, जेव्हा तुम्हाला माहीत असते की तुम्ही आहारातून बाहेर पडून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची हिच वेळ आहे.
थोडे नवीन जरा जुने