रोज सकाळी १० मिनिटे करा फक्त हे काम! सुंदर, चमकदार त्वचा, दाट केसं आणि नैसर्गिकरित्या सुंदर होतील


सुंदर, चमकदार त्वचा, दाट केसं आणि नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्याची कोणाची इच्छा नसते ? जर तुम्हांलाही सुंदर चमदार त्वचा, दाट केस हवे असल्यास रोज सकाळी १० मिनिटांपर्यंत योगासने करा.

सध्याचे प्रदूषण, तणाव, अनियमित जीवनशैली आणि दिवस-रात्र धावपळ या गोष्टीमुळे लोक वयाच्याआधी वयस्कर दिसू लागतात. त्यामुळे कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या, पुरळ, मुरमा, काळे डाग अशा समस्या उद्भवतात.

अशात नियमित योगा केल्यास नैसर्गिक सुंदरता, चमकदार त्वचा आणि शारीरिक बदल दिसून येतात.  भारतीय आयुर्वेदिक पद्धतीत योगाच्या माध्यमातून तुम्ही अंतर्गत आणि बाह्य सौंदर्य सहज मिळवू शकाल.

दररोज केवळ अर्धा तास सकाळी किंवा संध्याकाळी सूर्य नमस्कार, प्राणायम, उत्थान आसन, कपाल भाती, धनुर आसन किंवा श्वास घेण्याच्या प्रक्रियेतून तुम्ही सौंदर्य किंवा आरोग्य स्वास्थ चांगले राहण्यास मदत होते.

दररोज सकाळी १० मिनिटं खालीलप्रमाणे योगासने केल्यास चमकती त्वचा आणि दाट केसांसाठी खूप फायदेशीर ठरते.

 केस गळती थांबवण्यासाठी प्राणायाम

शहनाज हुसैनच्या मते, केस आणि त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्राणायम खूप महत्वाचे कार्य करते. प्राणायममुळे तणाव कमी होतो. तसेच रक्त संचार चांगला होण्यास देखील मदत होते. दररोज १० मिनिटे प्राणायम केल्यास माणसाच्या शरीराची नैसर्गिकरित्या क्लिजिंग होते. प्राणायम केल्यास सफेद केस आणि केस गळण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.


मुरमा, पुरळ यापासून सुटका करण्यासाठी उत्थान आसन
उत्थान आसन केल्यास तुम्हांला पुरळ, मुरमा, काळे डाग यांसारख्या समस्येतून कायमची सुटका होते. कपालभाती आसन केल्यास शरीरातील कार्बन डायक्सॉईड हटवून रक्त साफ करण्यास मदत करते. त्यामुळे शरीरात हलकेपणा येतो.

३) नैसर्गिकरित्या त्वचा चमकदार करण्यासाठी धनुरासन

धनुरासन शरीरात रक्ताचा प्रभाव वाढवते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी धनुरासनाची मदत होते. यामुळे शरीरातील त्वचेवर नैसर्गिकरित्या चमक येते आणि त्वचेवर रंगत येते.


योगासन केल्यास थकव्यापासून मुक्ती मिळते आणि शरीरातील ऊर्जेचा प्रभावी संचार होतो. सूर्यनमस्कार केल्याने वाढत्या वयाच्या प्रभाव थांबवला जाऊ शकतो.
थोडे नवीन जरा जुने