तब्येत का सुधारत नाही? शरीर सदृढ करण्यासाठी....
आकारबध्द, सदृढ व आरोग्यपूर्ण शरीर व्यक्तिमत्व खुलवून दाखवते. आपले शरीर समोरच्यावर छाप पाडणारे असावे असे कोणाला नाही वाटत? बांधेसुध शरीर असावे सर्वांच्यात उठून दिसणारे असावे असे प्रत्येकाला वाटते. आणि असे शरीर स्वताचा आत्मविश्वास वाढवते. त्यामुळे प्रत्येकजण आपले शरीर सदृढ करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. 


बरेच जण आपली बॉडी बनवण्यासाठी विविध प्रकारचे औषधे घेत असतात. कोणी केळी खातो, कोणी दुध पिण्यास सुरु करतो, कोणी सप्लीमेंट सुरु करतो. हे ना ते मार्ग अवलंबतो, तरी देखील हे उपाय अपुरेच पडतात. कारण त्यामध्ये आपले शरीर का वाढत नाही याचा खोलवर विचारच केलेला नसतो. पोषक आहाराची मात्र रडच असते.

खरे तर शरीर सदृढ होणे हे भूक, पचनशक्ती, आहार, अनुवांशिकता, चयापचय, मन या सर्व गोष्टीवर अवलंबून असते. त्यामुळे कोणतेही उपचार करताना या सर्व गोष्टींची दुरुस्ती/बदल करावे लागतात.

अशक्त असण्याची मूळ कारणे : भूक न लागणे, व्यायामाचा अभाव, अनुवांशिकता, अपचन, कृमी, बद्धकोष्ठता, मूळव्याध, पित्तविकार, अपुरा आहार, अतितिखट मसालेदार, लिव्हरचे विकार, अतिश्रम ई. कारणामुळे तब्येत सुधारण्यास अडथळा येत असतो. याचबरोबर सतत चिंता, काळजी, मोठे दुख:, अतिविचार, जेवताना एकाग्र नसणे यासारख्या करणामुळे सुद्धा तब्येत सुधारत नाहीं.

तब्येत सुधारण्याचे उपाय : यासाठी आपल्याला पहिला आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे की, तब्येत का सुधारत नाही? या साठी आयुर्वेद तज्ञांचा सल्ला घ्यावा. तब्येत सुधारण्यास अडथळा ठरणारे कोलायटीस, मुळव्याध, पित्तविकार किंवा लिवर चे विकार यांचे उपचार सुरुकरून त्याच्यासोबत शक्तीवर्धक उपचार घ्यावे लागतात. 

त्याचबरोबर मानसिक चिंता कमी करणे, नेहमी आनंदी राहणे, माझ्या शरीरा पेक्षा दुसरे काहीच या जगात महत्वाचे नाही असे म्हणत बिनदास्त राहणे, सकस दुध, काजू, तूप, डिंकलाडू, बदाम, खजूर आपल्या आहारात घ्यावेत. भूक सहन करत बसण्यापेक्षा वेळेचेवेळी समतोल आहार घेत राहणे हे देखील अतिमहत्वाचे आहे. औषधी परिपूर्ण अशा तेलाने मसाज करणे यामुळेसुद्धा शरीर सुधारण्यास मदत होते.

त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, जाहिरातीतील औषधे घेण्याच्या मागे लागून स्वताचे किसे रिकामे करण्यापेक्षा या गोष्टींचे पालन केले तर निश्चितच फायदा होईल.
थोडे नवीन जरा जुने