अनियमित जीवनशैलीमुळे त्रस्त असाल तर मग "हे" नक्की वाचा !कायम थकवा, आळस आणि मरगळ येण्यासारख्या लक्षणाकडे अजिबात डोळेझाक करू नये. अनियमित जीवनशैलीमुळे अनेकवेळा असा त्रास होत असतो. 


हा त्रास वेळीच दूर करणे गरजेचे असते. काही उपाय करून सुद्धा ही समस्या कमी न झाल्यास डॉक्टरांकडून चेकअप करून घेतले पाहिजे.

डिहायड्रेशन 

शरीरात पाणी कमी झाल्याने शरीराचे वजन तीन टक्क्यांपर्यंत कमी होते. अशा स्थितीत पीडित व्यक्तीची मानसिक कार्यप्रणाली मंदावते आणि एकाग्रता करण्याची क्षमता कमी होत जाते. तसेच हलकी डोकेदुखी जाणवू लागते. अशावेळी जास्त प्रमाणात पाणी पिले पाहिजे.

मेडिसिन

काही औषधे असे असतात की ज्यांचे सेवन केल्यानंतर आळस येतो. उच्च रक्तदाब किंवा मायग्रेनसाठी देण्यात येणार्‍या बीचा ब्लॉकर्स मेडिसिन किंवा अँटीडिप्रेसेंट औषधाचे सेवन केल्याने पीडिताची एनर्जी लेव्हल खालावते. अशा स्थितीत तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सेलफोन

सारखे सारखे मोबाइल फोन पाहण्याच्या सवयीमुळे मेंदूच्या कार्यप्रणालीवर विपरीत परिणाम पडतो. तसेच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची आर्टीफिशियल ब्ल्यू लाइटमुळे झोपेच्या हार्मोन मेलाटोनची कार्यप्रणाली प्रभावित होते.
नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या एका सर्वेनुसार 19 ते 29 वर्षे वयोगटातील लोकांची झोप फोन किंवा मॅसेज आल्याने खराब होते. अशाने थकवा येणे स्वाभाविक आहे.

लोहाची कमतरता
शरीरात लोहाची कमतरता झाल्यास अंतर्गत अंगांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. शरीराला दररोज 18 मिलीग्रॅम लोहाची गरज असते. अशाने अनिमिया होण्याची शक्यता वाढते.


वेळेवर जेवण केल्यानंतर सुद्धा नेहमी थकवा येत असल्यास वेळीच सजग व्हा. जीवनशैलीत थोडासा बदल करून या स्थितीत सुधार केला जाऊ शकतो.
थोडे नवीन जरा जुने