मेंदू स्कॅन करताच कळेल,मनुष्याच्या मनातील विचार..

सर्वात स्मार्ट उपकरण म्हणजे आपला मेंदू. आपण दिवसभर वेगवेगळे विचार, वेगवेगळी कामे करत असतो. याचाच अर्थ की, मेंदूचे ही वेगवेगळे भाग वेगवेगळ्या वेळी कामे करत असतात. म्हणजे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे विचार आणि कार्य.


एखादी व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार घोळत आहे, याचा आधीच शोध घेतला जाऊ शकतो का? अमेरिकेत झालेल्या एका अध्ययनावर भरवसा ठेवला तर हे शक्य आहे. 

या अध्ययनातीलव दाव्यानुसार, मेंदूचे स्कॅन करून एखादी व्यक्ती आत्महत्या करण्याबाबत विचार करत आहे की नाही, याचा शोध घेतला जाऊ शकेल. या अध्ययनात सहभागी शास्त्रज्ञांनी सांगितले की, पोस्ट-ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरने (पीटीएसडी) ग्रस्त व्यक्तीच्या मनात येणाऱ्या आत्महत्येच्या विचारांशी संबंधीत एक रसायन आढळून आले आहे. 

सामान्य लोकांच्या तुलनेत पीटीएसडीने ग्रस्त असलेल्या व्यक्तीमध्ये आत्महत्येचा धोका जास्त असतो, पण जास्त प्रमाणात धोका असलेल्या व्यक्तीला ओळखणे अवघड आहे. अमेरिकेतील येल विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे हे अध्ययन प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकेडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रसिद्ध झाले आहे. 

त्यांनी एजीएलयूआर ५ नामक रसायनाची पातळी पडताळण्यासाठी पीईटी छायाचित्रांचा वापर केला. यादरम्यान त्यांना असे दिसून आले की पीटीएसडीने पीडित लोकांमध्ये एमजीएलयूआर ५ची पातळी अतिशय जास्त आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती एंजायटी व मूड डिसऑर्डरने ग्रस्त होते. 

पीटीएसडीने ग्रस्त लोकांंसाठी दोन प्रकारचे मान्यताप्राप्त उपचार आहे, मात्र ते शोध घेण्यास प्रभावी आहेत वा नाहीत हे जाणून घेण्यासाठी आठवडे व महिनेही लागू शकतात. एजीएलयूआर ५च्या पातळीची तपासणी करून ज्या लोकांमध्ये आत्महत्येचा धोका सर्वाधिक आहे, त्यांचा शोध घेण्यास मदत मिळू शकते व त्यांना तत्काळ मदत दिली जाऊ शकते.
थोडे नवीन जरा जुने