जाणून घ्या, हिंगाचा छोटासा तुकडा पाण्‍यासोबत घेलता तर काय होईल?


कोणत्‍याही स्‍वयंपाकाला चव येत असते ती फोडणीमुळे; फोडणीसाठी अनेक स्‍वयंपाकघरातमध्‍ये मोहरी बरोबरच हिंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. फोडणीत आधी मोहरी घातली जाते आणि मग घातला जातो हिंग. पदार्थाला उत्तम स्वाद देणारा, पचनाला उत्तम असा हिंग भारतीय स्वयंपाकात सगळीकडे आवर्जून वापरला जातो. 

याबरोबच हिंगचा वापर विविध आजारांवर उपयुक्त औषध म्‍हणून केला जातो. डोळ्यांचा आजार असल्यास हिंगाचे सेवन अवश्य करायला हवे. हिंग उत्तम पाचक असण्‍याबरोबच डोकेदुखी दूर करण्यासाठी हिंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

हिंगाचे झाड 2 ते 4 फूट लांब आणि ऊंच असते. हिंग वनस्‍पती, इराण अफगाणिस्तान, तुर्कस्तान, काबुल आणि खुरासानाच्‍या डोंगाराळ भागात मोठ्या प्रमाणात आढळते. या भागातूनच पंजाब आणि मुंबईमध्‍ये हिंगाची आयात करण्‍यात येते. महर्षी चरक यांच्यानुसार हिंग दम्याच्या रुग्णांसाठी रामबाण औषध आहे. कफाचा नाश, पोटाच्या समस्या, अर्धांगवायूमध्ये हिंग लाभदायक आहे.

हिंगाचे लाभ -


सुंठ, काळीमिर्च, पिंपळ, अजवाइन, पांढरे जीरे, काळे मिरे, शुद्ध तुपात भाजलेले हिंग आणि काळे मिठ समान प्रकाणात घेऊन बारीक वाटून घ्‍या. जेवन झाल्‍यानंतर प्रत्‍येक दिवशी 2 ते 4 ग्रॅम पाण्‍यासोबत घ्‍या. हे मिश्रण प्रत्‍येक दिवशी पाण्‍यासोबत घेतल्‍यास गॅसची समस्‍या दूर होते.

दातांच्या आजारावर हिंग फायदेशीर आहे. दात किडले असतील तर रात्री झोपताना हिंगाचा खडा दुखणा-या दातावर ठेवून झोपावे. हिंग पाण्यात उकळून गुळणा केल्यास दातांचे दुखणे कमी होईल. शरीरात काटा घुसला असेल तर त्या ठिकाणी हिंगाची पेस्ट लावावी. या उपायाने वेदना कमी होतील तसेच काटा बाहेर पडेल.
हिंग आणि पाण्‍याचे मिश्रणाचा नाभिजवळ लेप लावला किंवा भाजलेला हिंग मधासोबत घेतला तर पोटादूखी बंद होते.

हिंगाचा छोटासा तुकडा पाण्‍यासोबत घेलता तर पोटात येणा-या कळा, पोटदुखी बंद होते.

पोट दुखीचा त्रास होत असेल तर 2 ग्राम हींग अर्धा लिटर पाण्‍यात उकळून घ्‍या. पाणी उकळू द्या. पाणी उकळल्‍यानंतर पाणी कोमट होऊ द्या. कोमट झालेले पाणी प्‍यायलानंतर पोटदुखीचा त्रास कमी होईल.

हिंग आणि पाण्‍याचे मिश्रण गुडघ्‍याला लावल्‍यानंतर गुडघ्‍याचा त्रास कमी होतो.
दात दुखीचा त्रास होत असले तर हिंगाचा तुकडा दुखणा-या दाताजवळ ठेवा. यामुळे वेदना कमी होतील.

हिंग पाण्‍यात उकळून गुळणा केल्‍यास दात दुखी बंद होते.

सर्दीझाल्‍यामुळे डोकेदुखीचा त्रास होत असले तर पाण्‍यात हिंग मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण डोक्‍यावर लावले तर डोकेदुखी बंद होते.
थोडे नवीन जरा जुने