हृदयविकाराचा अचानक येणारा झटका रोखू शकता का? जाणून घ्या...


तज्ज्ञांच्या मते, हृदयरोग्याने जर विशेष काळजी घेतली तर हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो. हृदयासाठी धोक्याची सूचना देणारे प्रसंग आयुष्यात येतात, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात आढळून आले आहे. 

कोणते आहेत हे प्रसंग आणि त्यापासून बचाव कसा करता येईल, याबाबत जाणून घेऊया.

सोमवारी हृदयविकाराचा झटका सोमवारी सकाळीच येतो आणि याचे प्रमाण 20 टक्के एवढे आहे, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. 

तज्ज्ञांच्या मते, सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असतो, त्यामुळे अनेकजण त्यादिवशी कामावर रुजू होण्याचा विचार करीत चिंताग्रस्त होतात.

हे करावे : रविवारी शारीरिक आणि मानसिकरीत्या शांत व चिंतामुक्त राहावे. तसेच शनिवार आणि रविवारी रात्री उशिरा झोपू नये. कारण अशावेळी शरीराचा थकवा कायम राहील आणि पुढच्या दिवशी रक्तदाबही वाढेल.

जेवणानंतर - एका संशोधनानुसार, जेवणात अती चरबी, अती कबरेदकांचा समावेश केल्यास रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. तसेच रक्तात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमुख कारण असलेल्या रक्तांच्या गाठीचा धोकाही वाढतो.

हे करावे : वरील खाद्यपदार्थांचे सेवन करू नये. जर अवेळी जेवण करण्याची सवय असेल तर दिवसातून थोडे थोडे जेवण करावे. अँस्प्रिन गोळी घेतल्याने रक्तातील चिकट पदार्थ नियंत्रित राहतो.

बाऊल मुव्हमेंट - बाऊल मुव्हमेंट म्हणजे पोट साफ होण्याच्या प्रक्रियेदरम्यान व्यक्तीला हृदयरोगांचा धोका अधिक असतो. या वेळी छातीवर दाब वाढतो आणि हृदयातून इतर अवयवांना होणारा रक्तप्रवाह मंद होऊ लागतो.

हे करावे : जेवणात भरपूर फायबर म्हणजेच तंतुमय खाद्यपदार्थांचा समावेश करावा. तसेच पुरेसे पाणी प्यावे. यामुळे पोट साफ होईल आणि हृदयावर पडणार्‍या नकारात्मक प्रभावापासूनही बचाव करता येईल.

व्यासपीठावर - बहुसंख्य लोकांसमोर भाषण देणे हेसुद्धा एखाद्या व्यायामापेक्षा कमी नाही. ज्या लोकांना अशी सवय असते आणि ज्यांना सार्वजनिक ठिकाणी काही बोलावे लागल्यास त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात, तसेच रक्तदाब आणि अँड्रेनलिनची पातळीही वाढते.

हे करावे : अशा परिस्थितीत जेव्हा व्यक्ती जास्त चिंतेत असते आणि घाबरते तेव्हा त्या व्यक्तीसाठी बिटा ब्लॉकर फायदेशीर सिद्ध होऊ शकते.

सकाळची वेळ - हॉर्वर्ड विद्यापीठातील संशोधकांच्या मते, सकाळच्या वेळी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 40 टक्के अधिक असतो. या वेळी शरीरात अँड्रेनलिन आणि इतर स्ट्रेस हार्मोन अधिक सक्रिय असतात. यामुळे रक्तदाब वाढतो आणि शरीराला अधिक ऑक्सिजनची गरज भासू लागते. हृदयरोग्यांचे रक्त निरोगी लोकांच्या तुलनेत घट्ट असते. यामुळे हृदयाला रक्त शुद्ध करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. याच कारणामुळे सकाळच्या वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.

हे करावे : तज्ज्ञांच्या मते, सकाळी ठरलेल्या वेळेवर आणि गोंधळून न जाता झोपेतून उठावे. तसेच ज्यांना वारंवार स्नूझवर ठेवण्याची सवय असते, त्यांनी असे करू नये. निरोगी हृदयासाठी दररोज सकाळी व्यायाम करण्याची सवय लावावी. जे लोक बिटा-ब्लॉकर घेतात, त्यांनी झोपण्यापूर्वी याचे सेवन करावे, जेणेकरून सकाळच्या वेळी हृदयरोगांपासून बचाव करता येईल.

जोमदार व्यायाम - अनेकजण अचानक जास्त मेहनत असलेला व्यायाम करतात. मात्र, त्यांच्या शरीराला अशा मेहनतीची सवय नसते. अशा स्थितीत शरीरात स्ट्रेस हार्मोनची सक्रियता वाढते. यामुळे रक्तदाब आणि हृदयाचा वेग तीव्र किंवा अनियमित होतो.

हे करावे : निरोगी हृदयासाठी व्यायाम आवश्यक आहे; परंतु जास्त मेहनत धोक्याची आहे.
थोडे नवीन जरा जुने