लसणाचे 'हे' आरोग्यदायी गुणधर्म शरीरासाठी आहेत खूपच फायदेशीर !


लसणामुळे फक्त जेवणच चविष्ट होते असे नाही, लसणामध्ये असे बरेच गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वपूर्ण आहेत. जाणून घ्या या छोट्या लसणामध्ये कोण कोणते गुण लपलेले आहेत.
रोज लसणाचे सेवन केल्यास टीबी होत नाही. लसून हे किटाणुनाषक आहे, अँटीबायोटिक औषधांसाठी हा एक चांगला विकल्प आहे, लसणामुळे टीबीचे किटाणू नष्ट होतात.


अँटीबायोटिक - 

प्रथम लसणाला सोलून घ्या, लसणाच्या एका कुडीचे ३ ते ४ तुकडे करा. दोन्ही वेळेच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने लसणाचे दोन तुकडे तोंडात ठेऊन चगळा त्यानंतर पाणी प्या.


कॅन्सरपासून संरक्षण होते


कॅन्सरला बरा न होनरा आजार मानले जाते. परंतु आयुर्वेदानुसार रोज थोड्या प्रमाणात लसणाचे सेवन केल्यास कॅन्सर होण्याची शक्यता ऐंशी टक्के कमी होते. लसानामध्ये कॅन्सर विरोधी तत्व आहेत.लसणाच्या सेवनाने ट्युमरला पन्नास ते सत्तर टक्के कमी केले जाऊ शकते.


कॉलेस्ट्रॉल कमी करतो

कॉलेस्ट्रॉलची समस्या असणार्या लोकांसाठी लसणाचे नियमित सेवन अमृत ठरू शकते. कॉलेस्ट्रॉलची समस्या असणार्या लोकांसाठी लसुन संजीवनीपेक्षा कमी नाही. नियमित याचे सेवन केल्यास कॉलेस्ट्रॉलची पातळी १२ टक्क्यांनी कमी होते. हृदयाचे आजार लसणाच्या नियमित सेवनाने दूर राहतात.
गर्भवती महिलांसाठी लाभदायक -

गर्भवती महिलांनी लसणाचे नियमित सेवन करावे. गर्भवती महिलांना जर उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर, अशा महिलांनी गर्भावस्थेच्या दरम्यान कोणत्या न कोणत्या स्वरुपात लसणाचे सेवन करावे.


दात दुखीमध्ये लाभदायक -

लसणाच्या सेवनाने दात दुखीमध्ये आराम मिळतो. लसुन आणि लवंग एकत्र वाटून घ्या आणि तयार झालेले मिश्रण दुखणाऱ्या दातावर लावल्यास आराम मिळेल.


सर्दी, खोकला -

बदलत्या वातावरणात कोणत्याही वयाच्या व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप हे आजार होण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही लसणाचे नियमित सेवन केले तर या छोट्या-छोट्या आजारांपासून दूर राहाल.


दमा दूर करण्यासाठी उपयुक्त - 

दम्याच्या त्रासावर लसून हे एक उपयुक्त औषध आहे. ३० मिली दुधामध्ये लसणाच्या पाच कुड्या टाकून दुध गरम करा. रोज हे गरम दुध पिल्याने दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होईल. अद्र्काच्या चहामध्ये थोडा लसण टाकल्याने दमा नियंत्रित राहतो.


डोके दुखीसाठी रामबाण उपाय - 

एका लसणाच्या ४ कुड्या तीस ग्रॅम मोहरीच्या तेलामध्ये टाका. तेल थोडे गरम करा आणि त्या तेलाने मालिश करा डोके दुखणे थांबेल.


व्हिटामिन 'सी' ची कमतरता असल्यास 
 
ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल त्यांनी लसणाचे नियमित सेवन करावे. यामध्ये पर्याप्त मात्रामध्ये लोह असते जे रक्त निर्माण करण्यामध्ये सहायक असते. लसनामध्ये व्हिटामिन 'सी' असल्यामुळे स्कर्वी रोगापासून बचाव होतो.
थोडे नवीन जरा जुने