लग्नापूर्वी शारीरिक संबंध योग्य की अयोग्य? पहा ही खास वेब सीरिजपुणे : लग्नापूर्वी शारीरिक संबंध योग्य की अयोग्य? हा अनेकांसमोरचा प्रश्न असतो. पण यावर कुणीही मोकळेपणाने बोलू शकत नाही. लैंगिक शिक्षणाबाबतचा अभाव यामागचं कारण आहे. पण याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि मोकळेपणाने संवाद निर्माण व्हावा यासाठी खास वेब सीरिज तयार करण्यात आली आहे.

पुण्यातील प्रयास हेल्थ ग्रुपकडून ही वेब सीरिज बनवण्यात आली आहे. सेफ जर्नी (‘Safe Journeys’) असं या सीरिजचं नाव आहे. आजकालची युवा पिढी आणि लैंगिक आरोग्य यावर या वेब सीरिजमधून भाष्य करण्यात आलंय.

या सीरिजबद्दल माहिती देताना प्रयास हेल्थ फाऊंडेशनच्या ग्रुप कोअर टीमचे डॉ. शिरीष दारक म्हणाले, “सेक्स, लैंगिक शिक्षण किंवा त्याविषयीचं आरोग्य याबाबत समाजात बोललं जात नाही. सेक्स या विषयावर पालक आणि मुलांमध्ये देखील चर्चा होत नाही.

सेक्स या विषयावर प्रत्येकाने खुलपणाने बोललं पाहिजे यासाठी आम्ही ही वेब सीरिज तयार केली आहे, जेणेकरून या माध्यमातून लोकांमध्ये सेक्स आणि सेक्सुअल हेल्थ याबाबत जनजागृती होईल.”

8 एपिसोड असणारी वेब सीरिज तयार करण्यात आली आहे. प्रयास हेल्थ ग्रुपच्या युट्यूब चॅनलवरही सीरिजचे एपिसोड पाहायला मिळेल. 
थोडे नवीन जरा जुने