कोट्याधीश बनण्यासाठी आजपासूनच ह्या टिप्स फॉलो करा !


1- आपल्या इनकमचा 10 टक्के इंवेस्ट करा
सर्वात आधी तुम्ही आज आणि आताच आपल्या इनकमचे दहा टक्के इनवेस्ट करायला सुरूवात करा. हा इनवेस्टींगचा पहिला नियम आहे की, तुम्ही अजिबात विचार करायचा नाही की तुमची सॅलरी वाढल्यानंतरच तुम्ही इनवेस्ट कराल. सध्या तुम्ही जेवढे कमावता त्यात कमीतकमी दहा टक्के तर तुम्ही इंवेस्ट करायलाच पाहिजे. यासाठी तुमची सॅलरी आणि खर्चाचा हिशोब करा. जेव्हा तुम्ही या दोन गोष्टींचा हिशोब कराल तेव्हा लक्षात येईल की फाजील खर्च काय आहे आणि तो कसा थांबवायचा.

2- ईएमआय किंवा क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरा
सध्या बहुतांश लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात आणि ईएमआयवर सामान खरेदी करतात. जर तुम्ही सुध्दा भरत असाल तर चुकूनही याचे पेमेंट उशीरा देऊ नका. असेच क्रेडिट कार्डचे पेमेंटसुध्दा लेट करू नका. क्रेडिट कार्डमध्ये मिनिमम बिल पेमेंटच्या भानगडीत पडू नका असे केल्यास तुमच्या बिलात अनेक प्रकारचे टॅक्स लागतील आणि भरणा रक्कम वाढत जाईल.

3- कठीण प्रसंगांसाठी तयार ठेवा एमरजंसी फंड
तुम्ही जे काही इंवेस्ट करणार आहात ते वेगळे ठेवा. त्यानंतर तूमच्या जवळ एक एमरजंसी फंड असायला पाहिजे. कारण तुम्हाला काही अडचनी आल्या तर इंवेस्ट केलेले पैसे काढायची किंवा कोणाकडे मागण्याची गरज नाही पडली पाहीजे. जर तुम्ही इंवेस्ट केलेले पैसे विदड्रा केले तर तुमचा सगळा प्लॅन विस्कळीत होईल. आणि कर्ज घेतले तर तो सुध्दा तुमच्यावर अतिरिक्त भार पडेल

4- 4 ते 6 महिन्यांचा खर्चाचा फंड तयार करा.
तुमची इवेंस्टमेंट वेगळी आहे, एमरजंसी फंड वेगळा आहे तर मग खर्चांचा फंड एकदम वेगळा असायला पाहिजे. यात येणाऱ्या 4 6 महिन्याचे मंथली खर्चाचे फंड तयार करावे लागतील. हे खरे आहे की एवढे सगळे फंड एका दिवसात तयार होणार नाहीत. पण तुम्ही हळू हळू करून काही महिन्यात हे फंड तयार करा. खर्चाचे फंड तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात.यामुळे तुम्हाला माहिती राहते की तुमचा किती खर्च आहे.

5- मिळालेला नफा पुन्हा इन्वेस्ट करा
जर तुम्हाला इंवेस्ट केलेल्या पैशातून काही नफा होत आहे, जसे की तुमचा एखादा फंड मॅच्युर झाला असेल किंवा ट्रेडिंगमधून तुम्हाला काही फायदा झाला असेल आणि तुम्हाला त्या पैशाची आताच काहीही गरज नाही तर तो पैसा पुन्हा इंवेस्ट करा.

6- इंवेस्टमेंट प्लॅनमध्ये सतत गुंतवणूक करत रहा.
जर तुम्ही इन्वेस्टमेंट करण्यासाठी पाऊल टाकले आहे तर अजिबात थांबु नका. हे खरे आहे की तुम्हाला सहा महिने किंवा एक वर्ष रिटर्न मिळणार नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कधीच रिटर्न मिळणार नाही. तुम्हाला सतत इन्वेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक करावी लागेल. हताश किंवा निराश होऊन इंवेस्टमेंट मध्येच सोडू नका.

7- आपला इंवेस्टमेंट performance पहा
ही सगळ्यात चांगली सवय आहे, जर तुम्ही याला फॉलो नाही केले तर तुमचा इंवेस्टमेंट प्लॅन विफल होईल. इंवेस्टमेंटनंतर हे गरजेचे आहे नेहमी performance वर लक्ष ठेवले पाहिजे जर प्रत्येक सहा किंवा आठ महीन्यांतर तुम्हाला वाटले की रिटर्न मिळत नाही तर दुसऱ्या एखाद्या फंडमध्ये निवेश करा
थोडे नवीन जरा जुने