कडू कारलं आहे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर,जाणून घ्या फायदे !



कारल्याची चव कडू असली तरी यात अनेक ओषधी गुण आहेत. कारला कुकरबिटस वर्गातील भाजी आहे. अशिया, अफ्रिका आणि काही कॅरिबियन देशात कारल्याचे उत्पन्न घेतले जाते. कारल्याचे लहान कारले आणि मोठे कारले असे मुख्य दोन प्रकार आहेत. 

कारल्याची भाजी कारताना त्याची साल आपण काढून टाकतो. करल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी कारल्याच्या भाजीत मिठ, लिंबू आणि मसाले घातले जातात. कारल्याची चव कडू असली तरी अरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी कारले गुणकारी आहे. कारल्यात रेगप्रतिकारक आणि पोषक घटक असतात.

कारल्यामध्ये 6 ग्रॅम कार्बोहाइड्रेट, 15 ग्रॅम प्रोटीन, 20 मिलीग्रॅम कॅल्शिअम, 70 मिली ग्रॅम फॉस्फरस, 18 मिलीग्रॅम लोह, अ -व्हिटामिन, क- व्हिटामिन, कॅरोटिन, ग्लूकोसाइडस, सोपोनिन आणि अलकलाइड असतात. हे सर्व गुण कारल्यात असल्याने कारले औषधी आहे.

कारल्याचे औषधी उपयोग -

इन्फेकशनचा त्रास असणा-यांनी कारल्याची पाने उकडून खालल्यास फायदा होतो. याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

कारले खालल्याने चेह-यावरील दाग कमी होतात आणि स्किन इन्फेकशनचा त्रास कमी होतो.

कारल्याच्या रसात लिंबू पिळून सकाळी काहीही न खाता पिल्याने सर्व प्रकारचे त्वचा रोग नष्ट होतात.


एक चमचा कारल्याच्या रसात अर्धा चमचा साखर घालून खाल्याने मूळव्याध नाहिसा होतो.

कारल्याच्या रसाने मालिश केल्याने सांधिवाताचा त्रास कमी होतो.

कारल्याच्या रसात लिंबाचा रस एकत्र करून पिल्याने लठ्ठपणा कमी होतो.


कारल्यात फायबर असल्याने पचनसंस्था चांगली राहते. याबरोबरच अपचन आणि अ‍ॅसिडीटी सारख्या तक्रारिही कमी होतात.

हदय विकाराचा त्रास असणा-यांनासाठी कारले गुणकारी आहे. अर्टरी व्हॉलवर जमा होणारे खराब कोलेस्ट्रॉल कारले कमी करते त्यामुळे हदय विकाराचा धोका कमी होतो.

कारल्याच्या रसात सेंधे मिठ घालून खाल्याने अ‍ॅसिडीचीचा असणा-या लोकांना जेवणा अगोदर होणारा उलटीचा त्रास कमी होतो.


कारल्यात अ व्हिटामिन असल्याने कारल्याची भाजी खाणा-याना राताधंळेपणाचा त्रास होत नाही.

गुडघे दुखीसाठी कारल्याचा रस एक चांगला उपाय आहे.

कराल्याच्या तिन बी आणि तिन मिरी एकत्र उगाळून लहान बाळाला पाजल्याने उलटी बंद होते.


कारले मधूमेहावर एक रामबाण उपाय आहे. सावलीत वाळवलेल्या कारल्याची पावडर तयार करून रोज खाल्याने मधूमेह्याना फायदा होतो. करल्याने स्वादुपिंडा उत्तेजित होते त्यामुळे इन्सुलिनचा स्त्राव वाढतो.

कारल्यात बिटर्स आणि अलकेलाइड असल्याने यामुळे रक्तशुद्धी होते.


20 ग्रॅम कारल्याच्या रसात मध घालून पिल्याने मूतखडा विरघळून जातो.
थोडे नवीन जरा जुने