तुम्हला खरच भगवंत भेटलेत का ? असे ओळखाजैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन।भगवंत जाण त्याचेजवळी ॥ १ ॥
त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा । स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥ २॥
तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण । अनुभवी खूण जाणती हे ॥ ३॥
जाणती जे खूण स्वात्मअनुभवी । तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ॥ ४ ॥

जशी गंगा नदी वाहत असते तसे त्याचे मन असते. त्याच्याजवळ भगवंत आहे हे ह्या खुणेवरून समजावे. ॥१ ॥
देव त्याच्यापाशी त्याच्या भक्तीभावामुळे उभाच आहे व अशा भक्ताला स्वानंदाचा गाभा असा भगवंतच प्रत्यक्ष दिसतो॥२॥
त्याला भगवंताचे अंगुष्ठमात्र असणारे रूप दिसते , ज्याला हा अनुभव आहे त्यालाच ही खूण समजेल ॥३॥
 ही खूण ज्यांना आत्मस्वरूपाचा अनुभव मिळाला आहे तेच समजतात. तुका म्हणतो की ही पदवी म्हणजे स्थिती ज्याची ( पात्रता आहे) त्यालाच लाभते. ॥४ ॥
थोडे नवीन जरा जुने