असाध्य रोगांना दूर करणारे अदरक आहे वरदान,फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल !


आयुर्वेदात अदरकाला औषधी असल्याचे म्हटले आहे. अदरकात अनेक औषधी गुण आहेत. असाध्य रोगांना दूर करणारे अदरक वरदान आहे. 

तोंडापासून ते घशापर्यंतच्या अनेक रोगांत अदरक गुणकारी आहे. अदरक पचनशक्ती वाढविणारे आहे. अपचन, गॅसेस, उलटी, खोकला, कफ अशा अनेक आजारांत अदरक रामबाण औषध आहे. 

अदरकाचा पुढीलप्रमाणे उपयोग करून रोगांपासून मुक्ती मिळवा...

- अदरकाचा अधिकाधिक वापर केल्याने थंडी, ताप, घशाला सूज, हिरड्यांचे दुखणे आदी आजार कमी होतात.

- पाण्यासोबत सुंठ घासून यात थोडे जुने गुळ आणि पाच सहा थेंब तूप मिसळून गरम करून घ्या. जुलाब कमी होईल.

- अदरकाच्या रसात मध मिसळून चाटल्याने दमा कमी होतो.

- अदरकाचा तुकडा तोंडात ठेवून चावत राहा न थांबणारी उचकी थांबेल.

- अदरक खाल्ल्याने तोंडातील हानीकारक बॅक्टेरिया मरतात.

- अदरकाचा रस आणि पाणी समसमान प्रमाणात एकत्र घेतल्यास हृदयरोगात लाभ होतो.
थोडे नवीन जरा जुने