'ह्या' योगा टिप्सने कँसरवरही मात करता येऊ शकते!


धावपळीमुळे माणसाने प्रकृती आणि स्वतःचे सानिध्य गमावले आहे. यामुळे खूप सारे आजार होतात. आमच्याकडे योगा शिवाय स्वतः ला स्वस्थ ठेवण्याचा दुसरा पर्याय नाही. 

यामुळे तुमच्यासाठी काही योगा प्रकार जे तुम्हाला स्वस्थ ठेवतील असे घेऊन आलो आहोत.

१. संयम - 

२४ तासात आपण २४ तास डोक्याच्या काबूत असतो. सरळ भाषेत सांगायचं म्हटलं तर ठरवणे, जिद्द करणे होय. जर तुम्ही व्यसन करत असाल आणि संयम नसेल तर मरेपर्यंत सोडू शकत नाही.

व्यसन आणि क्रोध यामुळे खूप आजार होतात. संयमाची सुरुवात छोटे छोटे संकल्प करून करू शकतो. संकल्प करा की आजपासून त्याच गोष्टी करीन ज्यामुळे मी आनंदी राहील. आहार विहार, झोप जागरण, बडबड आणि मौन यामुळे संयम कमी होतो.

२. ईश्र्वर प्रानिधान: 

योगानुसार याचा अर्थ असा होतो की कोणत्याही एका देवाबद्दल दृढ राहणे. जीवनाच्या अखेपर्यंत कोनाएकावर मन लावून त्याला समर्पित केल्याने मन संकल्पवान धारणा संपन्न होते. हे जीवनाच्या सफलतेसाठी आवश्यक आहे. जो व्यक्ती अंधश्रद्धा वर विश्वास ठेवतो त्याचे जीवन भ्रमित होऊन जाते. यामुळे निर्णय क्षमता कमी होते. यामुळे तुमची बुद्धी दृढ बनते.

३. अंग संचालन - 

याला एक सूक्ष्म व्यायाम म्हणू शकतो.याला आसना पूर्वी करावे.यामुळे शरीर आसन करण्यासाठी तयार होते.यासाठी अतिरिक्त वेळेची गरज नाही. अंग संचालन कोणत्याही योग शिक्षका कडून शिकून घरी किंवा ऑफिस मध्ये करू शकतो.

४. प्राणायाम - 

अंग संचालनसोबत जर तुम्ही अनुलोम विलोम कराल तर ते तुमच्या शरीराला आतून सक्षम बनवते. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा प्राणायाम शिकावे.

५.ध्यान - 

याबद्दल सर्वजण आज जाणून आहेत. यामुळे आपली ऊर्जा पुन्हा संचयीत होते यामुळे ५ मिनिटांचे ध्यान तुम्ही कुठेही करू शकता.

६. योगा मसाज आणि आंघोळ - 

याचे खूप फायदे होतात. कमीतकमी तीन महिन्यात एकदा हे करावे ज्यामुळे शरीर पुन्हा ताजेतवाने बनते. हे व्यक्तीचा ताण तणाव आजारपण कमी करते. यामुळे व्यक्ती प्रदूषित वातावरणातून बाहेर पडून ताजातवाना होतो. हे तुम्ही घरीही करी शकता.

७. योग मुद्रा - 

यात दोन प्रकार आहेत एक हस्तमुद्रा आणि दुसरी आसनमुद्रा. तुम्ही हस्तमुद्रा शिकून वेळोवेळी करू शकता.  प्रमुख १० हस्तमुद्रा आहेत. १.ज्ञान मुद्रा २.पृथ्वी मुद्रा ३. वरुण मुद्रा ४.वायू मुद्रा ५.शून्य मुद्रा ६.सूर्य मुद्रा ७.प्राण मुद्रा ८.लिंग मुद्रा ९.अपान मुद्रा १०. अपान वायू मुद्रा.

८. योग बंध-योगात खूप साऱ्या बंधाच वर्णन केलेलं आहे. परंतु मुख्य ५ बंध आहेत. १. मुलबंध २.उद्दियान बंध ३.जालंधर बंध ४.बंधत्रय ५.महाबंध. यांना एकदा शिकले तरी ते आयुष्यभर उपयोगी पडतील.

९.आसन - 

यात तुम्ही फक्त सूर्यनमस्कार करू शकता. सकाळी संध्याकळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. तुम्ही सूर्यनमस्कार कमीतकमी ५ वेळा करावा की ज्यासाठी ५ मिनिट देखील लागणार नाहीत.

१०. योग क्रिया - 

योग क्रिया खूप आहेत आणि त्या अवघड देखील आहेत. यातील कोणतीही एक क्रिया शिकून घ्या. प्रमुख क्रिया १३ आहेत. १.नेती - सूत्र नेती घृत नेती २.धौती - वमन धौती, वस्त्र धौती,दंड धौति ३. गजकरणी ४.बस्ती - जल बस्ती ५.कुंजर ६. न्यौली ७.त्राटक ८. कपालभाती ९.धौकानी १०.गणेश क्रिया ११. बाधी १२.लघु शंख प्रक्षालन १३.शंख प्रक्षलन 

यातील काही उपाय जरी तुम्ही सुरू केले तरी ते तुमचे जीवन बदलू शकते फक्त तुम्ही ते नियमित आणि ईमानदारी ने करावे.
थोडे नवीन जरा जुने