पेनकिलर खात असाल तर आजच सोडा, आणि 'हा' घरगुती उपाय करून पहा !


सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती सर्वात पुढे राहण्याच्या प्रयत्नात शरीराकडे दुर्लक्ष करत आहे. अनेकवेळा घाईगडबडीत आपल्याला एखादी दुःखापत, जखम होते. त्यानंतर आपण तत्काळ आराम मिळावा यासाठी पेनकिलर घेतो परंतु यामुळे आराम मिळतोच असे नाही. 

जर तुम्हालाही अशीच एखादी, दुःखापत, जखम, अंगदुखी झाल्यामुळे वेदना होत असतील किंवा सूज आली असेल तर निर्गुंडीचा उपयोग करावा.

निर्गुंडी ही उत्तम वेदनाशामक आहे. इतर वेदनाशामक औषधांचे, गोळ्यांचे जसे दुष्परिणाम असतात तसे या वनस्पतीचे नाहीत. कोणत्याही प्रकारची सूज कमी करण्यासाठी निर्गुंडीचा पाला प्रभावी ठरतो.

उपाय - 

निर्गुंडीची पानं पाण्यात उकळून घ्या. गरम पाण्यात सुती कपडा भिजवून सुजलेल्या किंवा वेदनेच्या ठिकाणी शेका. या उपायाने अंगदुखी, लचक भरणे, शरीराचा विशिष्ट भाग दुखणे यामध्ये आराम मिळेल. कफ, खोकला, फुफुसावरील सूज कमी करण्यासाठी निर्गुंडीच्या पानांवर तूप लावून पानं गरम करून पाठीवर, छातीवर बांधा.

मोहरीच्या तेलामध्ये ओवा आणि लसुन भाजून त्या तेलाने मालिश केल्यास अंगदुखीमध्ये आराम मिळेल.

अक्रोडच्या तेलाने मालिश केल्यास हात-पायाचे जोडदुखीमध्ये आराम मिळेल.

लसणाची एक पाकळी चावून-चावून खाल्ल्यानंतर गुळणा करा. या उपायाने दातदुखीमध्ये १० सेकंदात आराम मिळेल.

थोडेसे जिरे तव्यावर गरम करून चूर्ण तयार करा. २-३ ग्रॅम हे चूर्ण गरम पाण्यातून दिवसभरात तीन वेळेस घेतल्यास पोटदुखीमध्ये आराम मिळेल.
थोडे नवीन जरा जुने