जाणून घ्या, बेली फॅटमुळे हाडे कमुकवत होतात का?



तुम्ही बेली फॅटमुळे त्रस्त असाल तर सजग व्हा. कारण त्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. याशिवाय सोडा ड्रिंक्स, अल्कोहोल, धूम्रपानामुळेही असे होते. तसेच नियमित वर्कआऊट न केल्यासही हाडांचे नुकसान होऊ शकते. 


शरीराची कार्यप्रणाली आयुष्यभर सुरळीत व व्यवस्थित ठेवण्यात हाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. अशावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. हाडे मजबूत ठेवण्यासाठी योग्य भोजनप्रणालीचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.

‘नॅशनल ऑस्टियोपोरोसिस फाउंडेशन’च्या क्लीनिकल डायरेक्टर फलिसिया कॉसमेन म्हणतात की, वाढत्या वयाबरोबर हाडे ठिसूळ स्वाभाविक आहे, मात्र अनेक वेळा ही स्थिती आधीच निर्माण होऊ शकते.

बेली फॅटही हानिकारक


रजोनिवृत्तीच्या आधी ज्या महिलांच्या बेलीमध्ये अर्थात पोटात अनावश्यक चरबी जमा होऊ लागते, त्यांना ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका अधिक असतो. थाईज आणि हिप्समध्ये (मांड्या व नितंब) असलेल्या चरबीच्या तुलनेत पोटात एकत्रित चरबी वेगळी असते. डॉ. कॉसमेन म्हणतात की, या चरबीमुळे असा हार्मोन सक्रिय होतो, जो शरीरास सूज वा जळजळ अशी लक्षणे निर्माण करतात. या कारणामुळेच हाडे ठिसूळ होऊ लागतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होऊ लागते.


अल्कोहोलमुळे नुकसान

जे लोक अल्कोहोलचे अतिसेवन करतात, त्यांच्या यकृत, मेंदू व शरीराच्या इतर अवयवांबरोबरच हाडांवरही दुष्परिणाम होतो. अशा वेळी हाडांची घनता कमी होते, ज्यास वैज्ञानिक भाषेत ‘ऑस्टियोपेनिया’ म्हणतात. ती ऑस्टियोपोरोसिसच्या प्राथमिक अवस्थेत होऊ शकते. धूम्रपानाचे व्यसनही ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढवतात. शरीरात कॅल्शियमची कमतरता हेही त्याचे मुख्य कारण आहे.


सप्लीमेंट्सपासून दुरावा

कॅल्शियमचा डोस पूर्ण करण्यासाठी कधीही सप्लीमेंट्सचा आधार घेऊ नका. डॉ. कॉसमेन म्हणतात की, कॅल्शियमची पूर्तता नेहमी खाद्यपदार्थांच्या माध्यमातून करायला हवी. कारण त्याच्या सप्लीमेंट्समुळे मुतखड्याचा धोका अधिक असतो, तर ज्येष्ठ नागरिकांना त्यामुळे हृदयविकाराचा धक्का बसू शकतो.


तर गांभीर्याने घ्या

ज्या मुली वा महिलांना मासिक पाळी नियमित येत नाही, त्यांना हार्मोनल असंतुलन होऊ लागते. ही स्थिती रजोनिवृत्तीच्या वेळी होणार्‍या त्रासाशी मिळतीजुळती असते. अशावेळी हाडांचे नुकसान होते, तर एनोरेक्सिया अर्थात कमी वजनाने पीडित असलात तरी हाडांचे नुकसान होऊ शकते. डॉ. कॉसमेन म्हणतात की, ज्यांची मासिक पाळी अनियमित असते, त्यांची रजोनिवृत्ती वेळेच्या आधी होऊ शकते. एस्ट्रोजेन हार्मोनची सक्रियता कमी झाल्यामुळे हाडांच्या नूतनीकरणाची गती मंदावू लागते.


दातांपासून सुरुवात

हाडांचे नुकसान होण्याची सुरुवात शरीराच्या कोणत्याही अवयवापासून होऊ शकते. दात वा हिरड्यांपासूनही त्याची सुरुवात होऊ शकते. जर जबड्याच्या हाडाचे नुकसान झाले तर दात कमकुवत होऊन पडू शकतात. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्थरायटिस अँड मस्क्युलोस्केलेटन अँड स्कीन डिसीज’च्या मते, जर डेंटिस्टकडून नियमित तपासणी करवून घेतली तर एक्स-रे काढून ऑस्टियोपोरोसिसची स्थिती कळू शकते.
थोडे नवीन जरा जुने