त्याहुनि आंधळा बराच मी - संत तुकाराम महाराजसमाजामध्ये कसे राहावे कसे वागावे हा संदेश तुकोबाराय देतात वाईट पाहण्या पेक्षा किवा ऐकण्यापेक्षा मी आंधळा, बहिराच बरा असे महाराज म्हणतात..

पापाची वासना नको दावू डोळा। त्याहुनि आंधळा बराच मी ।।१।।
निंदेचे श्रवण नको माझे कानी । बधीर करोनी ठेवी देवा ।। २ ।।
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याहूनी मुका बराच मी ।।३।।
नको मज कधी परस्त्री संगती । जनातून माती उठता भली ।।४।।
तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा । तू एक गोपाळां मज आवडसी ।। ५।।

संत श्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज आपल्या या आभांगातून माणसाला लाख मोलाचा संदेश देतात ते देवाला विनंती करतात माझ्या डोळ्यांना वाईट गोष्टी पाहू देवू नको. त्यापेक्षा मी आंधळाच बारा आहे.

कोणाची निंदा ऐकण्यापेक्षा तू मला बहिरा ठेव. माझ्या मुखातून कधीही अपवित्र वाणी बाहेर पडू देवू नको, त्यापेक्षा मी मुका झालेला बरा. मला कधीही परस्त्री ची संगत करण्याची पाळी येवू देऊ नको; एक वेळ मी मरण पत्करेन पण परस्त्रीसंग करणार नाही.

हे देवा मला या साऱ्या वाईट गोष्टीचा कंटाळा आलेला आहे, एक तू मात्र मला सदैव आवडतोस. मला तुझी भक्ती प्रिय आहे. तुझीच भक्ती करण्याची मला सद्बुद्धी दे.
थोडे नवीन जरा जुने