वेळ नेहमी बदतल असते....


हुशार असणार्या लोकांना  खूप गोष्टी कळतात, पण वळत नाहीत. काहीतरी आत जाणवते. चंचल मनाला बांधून वळले, तर सूत बनते नाहीतर मनात चलबिचल सुरू होते. मग अशी कोणती खास गोष्ट असते, जिने मनाला आनंद वाटतो?

स्वातंत्र्य? छंद? गाणी? खाणे? चॉकलेट? फुले? हवा? थंडी? सण? उत्सव?
जीवनात, रूटीनमध्ये, हळूहळू गोंधळाकडून आपण सुनियोजिततेकडे जातो. बाहेरच्या कोलाहलात स्वस्थ होतो.
अवघड ही अशी किमया कोण करते?
सरळ जीवनात कधी जखमा खूप होतात. वाटते या भरणारच नाहीत. पण, किमया होते. हळूहळू बदल होतो तब्येत सुधारते.

मनाच्या स्वैर विचारावर शांतीने आरूढ होणे मस्त जमू लागते.
शरीराच्या जखमा भरतात. हृदयाची दरी सांधली जाते. मन कणखर होते. रडू येणे कमी होते.
किमया होते, लक्षात ठेवा तुमचा निर्मळ आनंद तुम्हाला परतून मिळेल, वाईट काळ निघून जातो. श्रद्धा आणि सबुरी ठेवा. काहीतरी किमया होईल.
तंग आ चुके है कश्म कश जिंदगी से हम पावोगे वही, जो इस जहांको देगे हम
ही किमया व्हायला काळ जावा लागतो. कधी एक तास लागेल. कधी एक वर्ष, कधी एक तप लागेल.

अपघाताने जखम झाली की, वाटते मोठी जखम आहे. १ तासाने टाके घातल्यावर थोडे बरे वाटते. मग हळूहळू सुधारणा होते. लवकरच जखमेचे व्रण पुसट होतात.
ही किमया कोण करते? देह ती वैश्विक ऊर्जा की देव? प्रश्न खूप आहेत. याबद्दल प्रश्नच नाही. अच्छे दिन हवे आहेत.
पण,
तेरा किया हुआ बुरा, तेरे पास रहेगा
तेरा किया हुआ अच्छा, तेरे पास लौटकर आयेगा.
यालाच कर्माचा सिद्धांत म्हणतात. जुने वर्ष संपले म्हणून नाराज होऊ नका. काही तरी नवे येण्यासाठी, जुन्याला जावे लागते. कधीतरी दूर गेलेले यश, मागे पडलेले प्रसंग, रूप बदलून समोर येतात.

नवीन कार्य करण्यासाठी मनाने सतर्क राहणे आवश्यक असते. आयुष्यात जसे दु:ख येते, तसेच सुखही असतेच. सकारात्मक विचारांनी माणसांनी पाऊल पुढे टाकले तर येणारे दु:ख काहीसे कमी होण्यास मदत होते.

योग्य विचारांची सांगड घालण्यासाठी मनाचा रिकामेपणा दूर करण्यासाठी आपल्या हाती एखादे मन रमवणारे काम असणे आवश्यक आहे. यातूनच आनंदाचे काही क्षण आयुष्यात येण्यास मदत होते.
चांगले काम करीत राहा. हिशोब कुणीतरी किमयागार करतो आहे. विश्वास ठेवा.वेळ बदलतेच !
थोडे नवीन जरा जुने