पुरुषांना असतो महिलांपेक्षा जास्त प्रमाणात हृदयविकाराचा धोका !हृदय रोग आणि स्ट्रोक ही पुरुषांमधील मृत्यूची अनुक्रमे पहिली आणि दुसरी सगळ्यात प्रमुख कारणं आहेत. कार्डिओव्हॅस्क्युलर आजारात प्लाक हृदयाच्या धमन्यांना ब्लॉक करतो, ज्यामुळे हार्ट ऍटॅक  येतो. पाच पैकी एका पुरुषाचा मृत्यू कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांमुळे होतो. 


पुरुषांच्या धमन्यांमध्ये महिलांच्या धमन्यांच्या तुलनेत प्लाक जास्त आणि वेगाने जमतो, असं का होत, याचं कारण मात्र अद्याप समजलेलं नाही. काही तज्ज्ञांच्या मते, महिलांमध्ये चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नैसर्गिकदृष्ट्या अधिक असत. महिलामधील फिनेल हार्मोन एस्ट्रोजन हृदय रोगासाठी सुरक्षा कवचाचं काम करतं. जे पुरुषांमध्ये नसत. आजकाल तरुणांनाही कार्डिओव्हॅस्क्युलर आजार अधिक प्रमाणात होताना दिसतात. पाश्चिमात्य देशांमध्ये ४० वर्षांहून कमी वयाच्या ४ - ५ टक्के व्यक्तींचा मृत्यू हार्ट ऍटॅकमुळे होतो; तर भारतात हे प्रमाण १५ - १६ टक्के आहे.

संरक्षणात्मक उपाय : वयाची पंचविशी उलटली की कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी करा. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवा. धूम्रपान करत असाल तर ताबडतोब बंद करा. तुमची शारीरिक सक्रियता वाढवा. दररोज कमीतकमी ३० मिनिट कोणताही व्यायाम करा. फळे आणि भाज्यांचे सेवन अधिक प्रमाणात करा, यामध्ये ट्रान्स फॅट आणि संच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण कमी असतं.

तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा... 

छातीमध्ये तीव्र वेदना होत असतील तर (हा हार्ट ऍटॅकचा संकेत अस् शकता) जोरजरात श्वास घ्यावा लागणे, बेशुद्ध पडणे. फुप्फुसांमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्याने त्वचेचा रंग निळा होणे.
थोडे नवीन जरा जुने