आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीमध्ये करा थोडासाच बदल,होईल खूप फायदा !


आजच्या व्यग्र जीवनात बहुतांश लोकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. परंतु तुम्ही आता कितीही व्यग्र असा, नवीन अशा काही पद्धती आहेत, त्याद्वारे आरोग्य चांगले राहील. मात्र, यासाठी आहार आणि जीवनशैलीमध्ये थोडा बदल करणे गरजेचे आहे. 2013 मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात कोटी लोकांच्या आजाराचे कारण त्यांच्या कामातील व्यग्रता आहे.

बॉडी मसाज


वेळोवेळी बॉडी मसाज केल्याने एनर्जीच्या पातळीत वाढ होते. तुम्हाला बॉडी मसाज करण्यासाठीही वेळ मिळत नसेल तर दररोज २० मिनिटे स्ट्रेचिंग किंवा मेडिएशन अवश्य करा. मसाज केल्याने बॉडी रिलॅक्स होते. थकवाही लवकर येत नाही.


जास्त कॅफिन नको

काम करताना आपण किती चहा आणि कॉफी पितो याचा पत्ता नसतो. परंतु त्याच्या सेवनाने आपल्या दातांवर दुष्परिणाम होतो.अशा वेळी न्यूट्रिशियश डाएट घेऊनही उपयोग होत नाही. त्यासाठी चहा, कॉफीचे सेवन मर्यादित करायला हवे.


मेकअप नको

तुमचा जास्त वेळ कार्यालयात जात असेल तर चेहऱ्यावर जास्त मेकअप करू नका. अशाने मेकअपची कोटिंग त्वचेत जाऊन बसते. दिवसभर मेकअप केल्याने त्वचाही खराब होते. मेकअपमुळे पावसाळा आणि धुळीत समस्या उद्भवतात.


ओमेगा सप्लिमेंट

निष्काळजीपणाने केलेल्या जेवणाचा परिणाम आरोग्यावर होतो. अशा वेळी सप्लिमेंटचे सेवन करा. ते सर्व गोष्टी पूर्ण करेल. यातील एक आहे ओमेगा ३. याने इम्यून सिस्टिम बळकट, हृदय केस आणि त्वचा निरोगी ठेवली जाते. फिश ऑइल कॅप्सूल्स, जवस, ऑलिव्ह तेल आणि अखरोट चांगला स्रोत आहे.
थोडे नवीन जरा जुने