अत्यंत सामान्यपणे आढळणा-या आरोग्य समस्या 'पाठदुखी आणि सायटिका'


पाठदुखी आणि सायटिका या अत्यंत सामान्यपणे आढळणा-या आरोग्य समस्या आहेत; किंबहुना सर्दीनंतर हेच आजार सर्वाधिक प्रमाणात आढळतात. बहुतेक रुग्णांमध्ये या वेदना कमी कालावधीसाठी असतात. पण, काही रुग्णांना असह्य वेदनांना सामोरे जावे लागते. गंभीर प्रकरणांमध्ये पाठीच्या कण्यातील नसा सुजतात आणि त्यांचा दाह होतो आणि काही वेळा आकुंचन पावतात. त्यामुळे पायांना बधीरपणा येतो आणि अशक्तपणा जाणवतो. अशा परिस्थितीत हालचाल करणे आणि दैनंदिन कामे करणे कठीण होऊन जाते.
मणक्याचे सख्खलन म्हणजे काय :आपला पाठीचा कणा पाठीच्या कण्याच्या हाडांनी तयार झालेला आहे आणि पाठीचा कणा व मज्जातंतूंच्या आवागमनासाठी तो एक संरक्षक नळी तयार करतो. पाठीच्या कण्याची हाडे मणक्यांनी विभक्त झालेली असतात. मणके हे उशांसारखे किंवा शॉक अ‍ॅबसॉर्बिग पॅड्ससारखे काम करतात. जेव्हा हे मणके फाटतात तेव्हा जेलीसारखे न्यूक्लेअस त्यांच्यातून मोकळे होते आणि ते पाठीच्या कण्याच्या नसांना स्पर्श करते. त्यामुळे प्रचंड वेदना होतात आणि या नसांच्या मार्गातील पायाच्या भागात लहरी उत्पन्न होतात.

उपचार :पाठीच्या कण्याचे सर्जन कदाचित शस्त्रक्रिया करण्यास सांगतील या भीतीने आणि पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियेच्या भीतीने बहुतेक रुग्ण सेल्फ-मेडिकेशन (स्वत:च्या विचाराने औषधे घेणे), योगासने, फिजिओथेरपी आणि इतर उपचारांचा अवलंब करतात. नसांना आलेली सूज आणि दाह कमी झाल्यामुळे त्यांच्यापैकी काहींना दिलासा मिळतो. पण, हा दिलासा केवळ तात्पुरता असतो आणि काही रुग्णांची परिस्थिती अधिक गंभीर होते. त्यावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता असते.
समस्येचे गांभीर्य लक्षात घेता, सुरुवातीला औषधांनी व विश्रांतीची शिफारस करून उपचार करण्यात येतात आणि सौम्य प्रकरणांमध्ये व्यायाम सुचविण्यात येतात. मध्यम स्वरूपाच्या वेदना होत असतील, तर नव्‍‌र्ह इंजेक्शन्स किंवा स्पायनल इंजेक्शन्स देण्यात येतात आणि पारंपरिक उपचारांना दाद न देणा-या किंवा रचनात्मक बदल करणे आवश्यक असलेल्या काही रुग्णांवर लोकल अनेस्थेशिया देऊन टाकेरहीत एण्डोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात येते.

टाकेरहीत शस्त्रक्रिया म्हणजे काय :पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियेत एक क्रांती घडवून आणणारी ही एक दिवसाची शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेत, प्रभावित मणक्यापर्यंत बाजूने स्नायू व ऊती फुगवून एण्डोस्कोप घालण्यात येतो. ही टाकेरहीत शस्त्रक्रिया आहे.

एण्डोस्कोप आणि लेझर :एण्डोस्कोपमुळे आतील भागाची परिस्थिती व्यवस्थित कळते. त्यामुळे बाहेर आलेला, सख्खलन झालेला किंवा हर्निया झालेला मणक्याचा भाग काढून टाकणे शक्य होते.

 एक दिवसाची शस्त्रक्रिया :ही शस्त्रक्रिया टाकेरहीत आणि लोकल अनेस्थेशिया देऊन करण्यात येत असल्याने वेदनांपासून लगेचच दिलासा मिळतो.

शस्त्रक्रियेची आवश्यकता :> पाठदुखीचा त्रास असेल किंवा ती वेदना तुमच्या पायांपर्यंत जात असेल.
> मांडीत, गुडघ्यात वेदना होत असतील.
> मांडी घालून बसणे कठीण जात असेल.
> टाचेत वेदना होत असेल किंवा सकाळी उठताना वेदना होत असतील.
> पायात किंवा पोट-यांमध्ये वेदना होऊन झोपमोड होत असेल किंवा पायात गोळे येत असतील.
> पाठदुखी किंवा कुशीवर वळल्यामुळे झोप व्यवस्थित होत नसेल.
> थंड हवामान सहन होत नसेल किंवा पंख्याखाली झोप येत नसेल.
> उभे राहिल्यामुळे किंवा चालल्यामुळे पायात गोळे येत असतील किंवा पाय दुखत असतील.
> बधीरपणा किंवा मुंग्या येणे, तळव्यांची आग होणे.
> पाय, पाऊल किंवा पायाच्या बोटांमध्ये अशक्तपणा किंवा पादत्राणे पायातून निसटत असतील.
> मलविसर्जनाच्या समस्या.
> तुम्ही एमआरआय चाचणी केली असेल किंवा स्पायनल वा एपिडय़ुरल (मेंदूच्या आवरणाबाहेरील) इंजेक्शन घेतले असेल.
> तुम्हाला पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल.
> जर पाठीच्या मणक्यांचे सख्खलन झाले असेल.
थोडे नवीन जरा जुने