अशा प्रकारे ओळखा कावीळ,जाणून घ्या लक्षणे आणि उपाय !


कावीळ हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये यकृत कमजोर होऊन काम करणं बंद करतं. कावीळ तेव्हा होते, जेव्हा शरीरात बिलीरूबिनचे प्रमाण वाढतं आणि याचा परिणाम यकृतावर होतो, ज्यामुळे यकृताची काम करण्याची क्षमता हळूहळू कमी होते. अशावेळेस बिलीरूबिन हळूहळू संपूर्ण शरीरात पसरतं. ज्यामुळे व्यक्तीला कावीळ होते.

रक्तामध्ये बिलीरूबिनचे प्रमाण जसंजसं वाढतं, तस किडनी रक्ताला शुद्ध करण्यास असमर्थ ठरते. यामुळे लघवीचा रंग गडद पिवळा होतो.

काविळीची लक्षणं - 

रक्तातील बिलीरूबिनची पातळी वाढण्याने त्वचा, नखं आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसायला लागतो. यकृताच्या कोणत्याही अन्य समस्येप्रमाणे काविळीतही यकृताच्या समस्या निर्माण होतात. 

फ्ल्यूसारखी लक्षणंही दिसतात. रुग्णाला ताप येऊ लागतो. अन्नाच्या प्रति अरूची आणि भूक कमी लागते. पोटात वेदना होतात, कधीकधी मुरडा आणि वजन कमी होण्यासारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागते. लघवीचा रंग गडद पिवळा होतो.

वैद्यकीय तपासणी शारीरिक तपासणी केली असता अंदाज येऊ शकतो की, कावीळ होऊ शकते अथवा नाही. विशेषतः डोळे व त्वचेच्या रंगावरून हे ओळखता येते. तरीही पुष्टी मिळावी याकरता फुल ब्लड काऊंट किंवा कम्प्लीट ब्लड काऊंट, हेपेटाइटिस ए, बी, सी च्या तपासण्या करता येतात.

काविळीची कारणं - 


घाणेरडं पाणी पिण्याने किंवा दूषित अन्नाचे सेवन करण्याने हॉटेलमधील अन्न सातत्याने खाणे यकृत कमजोर होणे, 

अशा स्थितीत ऊसाचा रस अवश्य प्या.यामुळे कावीळ बरी होण्यास मदत होते. ऊसाच्या रसात एवढी ताकद असते की, तो रक्त आणि यकृतातील अधिक बिलीरूबिन काढून टाकतो. जेवणात सलाद म्हणून मुळ्याचा समावेश करावा.
थोडे नवीन जरा जुने