नखांचा रंग बदलणे, हा गंभीर आजाराचा संकेत असू शकतो...


पिवळी नखे : 
नखांचा रंग बदलून नखे पिवळी पडणे, हा गंभीर आजाराचा संकेत असू शकतो. जसे रक्ताल्पता, कॉन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, यकृताचा आजार किंवा कुपोषण इत्यादी.

त्याच्याव्यतिरिक्त नखे पिवळी पडण्याचे सर्वात सामान्य कारण आहे बुरशीचे संक्रमण. जसजसे हे संक्रमण वाढते तसतसे नखात दिसून येणारा रक्ताचा लाल रंग कमी होत जातो. नखे मोठी होतात किंवा तुटून पडतात. खूपच कमी प्रकरणांमध्ये पिवळी नखे गंभीर थायरॉइड रोग, फुप्फुसांचा आजार, मधुमेह किंवा सोरायसिस सारख्या गंभीर स्थितीचा संकेत देतात.


निळी नखे : 

नखांवर निळा रंग असल्यास त्याचा अर्थ असा असू शकतो की, शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकत नाही. हे एम्फिसिया सारख्या फुप्फुसांच्या समस्येमुळे होऊ शकते. किंवा कोणत्याही हृदयासंबंधी समस्येचाही संकेत असू शकते.


लालभडक नखे  : 
अशी नखे सोरायसिस किंवा संधिवात यांचा सुरुवातीचा इशारा असतात. नखांचा रंग बदलणे सर्वसाधारण आहे. कधी कधी नखांची आतील त्वचा लाल किंवा तपकिरी रंगाची दिसून येते.


दातांनी चावणे : 
अनेक लोकांना नखे चावण्याची सवय असते. पण ती तणाव किंवा व्यग्रता यांचा संकेत असू शकते. नखे चावण्याचा संबंध ओसीडी (ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर) शी सुद्धा असतो. ज्यामध्ये व्यक्तीला कोणतेही कार्य चिंता अवसाद स्थितीत परत परत करण्यास भाग पडते. जर नखे चावणे थांबवणे शक्य नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.


कोरडेपणा : 
कोरडे आणि सहज तुटणारी नखे थायरॉइडशी संबंधित असू शकतात. पिवळा रंग आणि नखांचे तुटणे बुरशी जन्य संसर्ग यामुळे होऊ शकते. सूज आल्याने नखांच्या आसपासची त्वचा लाल आणि सुजलेली दिसून येते. असे झाल्यास ते त्वचा रोग आणि टिश्यू डिसऑर्डरचा परिणाम होऊ शकतो. संसर्ग नखांच्या आसपासच्या त्वचेवरील लाल रंग आणि सूज वाढवितो.
थोडे नवीन जरा जुने