विसरभोळेपणाने त्रस्त असाल तर 'हे' काही उपाय नक्कीच ठरतील फायदेशीर....


अभ्यासाचा ताण आणि कामाचा वाढता बोझा यामुळे आजकाल लोकांचा विसरभोळेपणा वाढत आहे. वय काहीही असो हा आजार कोणालाई होऊ शकतो. त्यामुळे लोक आपल्या क्षेत्रात प्रभावीपणे काम करू शकत नाहीत. 

काही लोक आपली स्मरणशक्ती वाढविण्यासाठी अनेक प्रकारची औषधे घेतात. तुम्हीही विसरभोळेपणाने त्रस्त असाल तर पुढील योगीक क्रिया शिकून घ्या.

- सरळ उभे राहा. दोन्ही पाय जुळवा. नजर समोर असेल. आता दहा वेळा जाराने श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता डोळे मिटून शांतपणे काही क्षण उभे राहा.

- दुस-या प्रकारात पुन्हा तोच प्रकार करा. दहा वेळा जोरात श्वास घ्या आणि सोडा. आता पुन्हा एकदा श्वास घ्या आणि वरच्या दिशेने पाहा. यावेळी संपूर्ण शरीर सैल सोडा.

लाभ. 
या क्रियेने विचार करण्याची शक्ती वाढते. मन शांत होते. डोळ्यांचा व्यायाम होतो. मेंदूची शक्ती वाढते. डोकेदुखीपासून मुक्ती मिळते. डोळे तेजस्वी बनतात. स्मरणशक्ती वाढते.
थोडे नवीन जरा जुने