"ह्या" काही खास उपायांनी तुम्ही अती रागावर नियंत्रण मिळवू शकता !प्रत्‍येक व्‍यक्‍तीचा स्‍वभाव हा वेगवेगळा असतो. काही लोक शांत स्‍वभावाची असतात तर काही लोक रागीट स्‍वभावाचे असतात. शांत स्‍वाभावाच्‍या लोकांच्‍या असण्‍याची चाहूलही लागत नाही. मात्र राग येणा-या लोकांची आदळ आपट सारखी सुरू राहाते. 


रागीट स्‍वभावामुळे संबंध बिघडतात. त्‍यामुळे रागीट स्‍वभावाच्‍या व्‍यक्‍तीला नेहमी पश्चाताप करावा लागतो. आज आम्‍ही आपल्‍याला काही TIPS सांगणार आहोत ज्‍यामुळे तुम्‍ही तुमच्‍या रागावर नियंत्रण ठेऊ शकता.

प्रत्‍येक तासाला स्‍वत: स्‍वात:ला तपासत राहा. काही प्रश्‍न स्‍वत:ला विचारा, मुड कसा आहे? काम करत असताना सातत्‍याने काम करू नका, काम करत असताना थोडा ब्रेक घ्‍या. यामुळे ताण येत नाही.

जर एखाद्या अडचणीमुळे तुम्‍हाला त्रास होत असेल तर त्‍या समस्‍येवर शांत डोक्‍याने मार्ग काढा.

काम करत असताना त्रास होणार नही यासाठी प्रयत्‍न करत रहा. रागावर नियंत्रण मिळवण्‍यासाठी व्‍यायम करत राहा.

आपल्याला राग आल्यानंतर दुस-या व्यक्तीला आपण जबाबदार ठरवतो. आपल्याला राग येण्याचे कारण आपण असतो त्यामुळे दुस-यांना जबाबदार ठरवू नका. स्वत:ला राग आला असेल तर राग इतरांवर काढण्यापेक्षा शांत होण्याचा प्रयत्न करा. कारण नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी स्वत:वर असते. 

समस्येचे कारण म्हणून रागाकडे पाहिले तर आपण ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. समस्या काय आहे समजून घ्या. राग येण्याची कारणे काय आहेत याचा आंदाज घ्या. आणखी वाचा पुढील स्लाईडवर...

स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी मेडिटेशन हा चांगला पर्याय उपलब्ध आहे. संवेदनशील होण्याचा प्रयत्न करा. यामुळे साध्या-साध्या गोष्टीचा राग येत नाही.
थोडे नवीन जरा जुने