ऑफिसमधील वातावारणावरच अवलंबून असतो तेथील ताण- तणाव !


आजकालची जीवन धावपळीचे, गुंतागुंतीचे आणि ताणतणावाचे आहे. ऑफिसमधील कामाचा ताण, वातावरण याचा नक्कीच आपल्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे सभोवतालच्या वातावरणाचा केवळ मनावरच नाही, तर शरीरावरही परिणाम होत असतो. सकारात्मक आणि चांगल्या वातावरणामुळे मन प्रसन्न राहते आणि शरीरालाही स्वास्थ मिळते. 

त्याचवेळी तणावपूर्ण आणि नकारात्मक वातावरणामुळे मन उदास होते आणि त्यामुळे हळूहळू शारीरिक स्वास्थ बिघडू लागते.

ऑफिसमधील वातावरण तणावपूर्ण नसेल, तर तेथील कर्मचाऱयांचे शारीरिक स्वास्थ टिकून राहते, असे संशोधनातून स्पष्ट झालंय. वेक फॉरेस्ट विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, ज्या ऑफिसमधील वातावरण नकारात्मक आणि तणावपूर्ण असते तेथील कर्मचाऱयांचे शारीरिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता ५० ते ५५ टक्क्यांनी वाढते. तसेच ज्या ऑफिसमधील वातावरण सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण असेल, तेथील कर्मचाऱयांची जीवनशैली एकदम स्वस्थ असते.

या संदर्भात करण्यात आलेल्या संशोधनातून हे स्पष्ट झालंय की ऑफिसमधील वेगवेगळ्या वातवरणाचा तिथे वेगवेगळ्या स्तरावरील काम करणाऱया कर्मचाऱयांच्या जीवनशैलीवर वेगवेगळा परिणाम होत असतो.

स्वस्थ जीवनशैली असलेल्या लोकांच्या ऑफिसमधील वातावरण तणावमुक्त असल्याचे निष्कर्षातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या क्षेत्रात आणखी संशोधन होण्याची गरज आहे. 


तरीही या निष्कर्षातून हे स्पष्ट होते की कोणत्याही मोठ्या ऑफिसमध्ये स्वस्थ जीवनशैलीचा पुरस्कार करताना तेथील कामाचे वातावरण तणावमुक्त असणे गरजेचे आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.
थोडे नवीन जरा जुने