नोकरी करत असाल,तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे...


पहिल्या नोकरीपासूनच दूर दृष्टीकोन ठेवला पाहिजे. दूर दृष्टीकोन हा यश मिळवण्यात फार महत्त्वाची भूमिका बजावत असतो. भविष्याचा अंदाज घेऊन सध्याच्या परिस्थितीत कोणते आणि कसे बदल केले पाहिजेत यासाठी नेमका कसा विचार केला पाहिजे याचा अंतर्भाव दूर दृष्टीकोनात होत असतो. दूर दृष्टीकोन ठेवण्यासाठी खालील गोष्टींची सवय लावली पाहिजे. 

ऑफिसमध्ये वेळेच्या पाच मिनिटे आधी पोहचा. छोटी कामे करणे न टाळता ती वेळच्या वेळी हातावेगळी करा. सगळी कामे वेळेत पूर्ण करा. उत्तम संभाषण , कामाविषयीची निष्ठा आणि शिस्त तुमच्याबद्दल चांगले मत तयार होण्यास मदत करतात आणि तुमच्या यशाचा मार्ग सुकर होतो. 


आळस करू नका. कामातून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा, ढोर मेहनत करू नका. काम समजून उमजून करा. आपले काम स्वावलंबीपणाने करा. सगळ्यांना समान न्याय द्या. 

सगळ्यांशी चांगला व्यवहार ठेवा. दुसऱ्याचे यशदेखील साजरे करा. दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करू नका,दुसऱ्याला विनाकारण सल्ले देऊ कोणी, किती नावे ठेवली,अपमान केला तरी स्वत:च्या ध्येयावरून लक्ष ढळू देऊ नका. गॉसीपिंग करू नका, त्यात व्यर्थ वेळ वाया घालवू नका.
थोडे नवीन जरा जुने