लघवी होताना जळजळ होत आहे? मग हे कराच...अन्नपदार्थाप्रमाणेच दुधी भोपळ्याचा वापर इतरत्रही होतो. चांगला वाळलेला दुधी भोपळा नव्याने पोहायला शिकणारे आणि मासेमार पाण्यावर तरंगण्यासाठी वापरतात. वाळलेल्या भोपळ्याचा वापर एकतारी तसंच अन्य काही वस्तू तयार करण्यासाठीही केला जातो.

» आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे दुधी भोपळ्याचा ९० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असतो. त्यामुळे हा उत्तम पाचक ठरतो.

मूत्राशयाचे सगळे विकार दूर करण्यास मदत करते. त्यामुळे लघवी होताना होणारी जळजळ होत नाही. जळजळ होत असल्यास ताज्या दुधीच्या रसात चमचाभर लिंबाचा रस घालून प्यायल्यास लघवीच्या वेळी होणारी जळजळ कमी होते.

» नियमित ज्युस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

» उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते, त्यामुळे तुमच्या हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं.

» मधुमेहीच्या रुग्णांना लागणारी अतिरिक्त तहान कमी करण्यास मदत करतं.

» बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं. पोटातील वात कमी करण्यास मदत करते.

» या भाजीचा आहारात नियमित समावेश केल्याने अकाली केस पांढरे होत नाहीत. सकाळी अनशापोटी नियमित ज्युस प्यायलाने लवकर असर पडतो.

» दुधीच्या ज्युसमध्ये चिमूटभर मीठ घातल्याने शरीराचा इलेक्ट्रोलेट संतुलन राखायला मदत होते. अतिसारावरही हे उत्तम औषध आहे.

» यकृत किंवा किडणीला सूज आल्यास डॉक्टर ही भाजी खाण्याचा सल्ला देतात. कारण सूजेवर ही भाजी रामबाण औषध आहे.

» प्रकृतीच्या बारीक-सारीक तक्रारीही दुधीचा ज्युस प्यायल्याने कमी होतात.

» तिळाचं तेल दुधीच्या रसात घालून प्यायल्याने निद्रानाशाचा त्रास कमी होतो.
थोडे नवीन जरा जुने