तरुणपणातच केस पांढरे झाले असतील तर ही आहेत कारणे आणि उपाय !
आज अनेकांचे खूप कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. केस पांढरे होण्याचे हे प्रमाण अचानक का वाढले या बाबत अनेक कारणे आहेत.
चला जाणून घेऊ या मागील कारणे...
अनुवंशिकता : तुमचे केस कुठल्या वयात पांढरे होणार, हे आनुवंशिकतेमुळे ठरते. साहजिकच कुणाला विशीतच हा अनुभव येऊ शकतो, तर काही जणांचे केस पन्नाशीतही काळेकुळकुळीत राहू शकतात.

पोषण आणि आहार : आहारामद्ये प्रथिने आणि इतर महत्वाचे जीवनसत्वे, तांबे आणि आयोडीन अशी खनिजे कमी प्रमाणात असल्यास मेलॅनिन बनणारे पेशी समूह नष्ट होऊ लागतात. त्यामुळे केस पांढरे होऊ शकतातसंप्रेरके : एसीतिएच, थायरॉईडसारकी काही संप्रेरके मेलॅनिन पेशींना कार्यरत ठेवत असतात .या पेशींचा अभाव झाल्यावर केस पांढरे होणारच. लहान मुलांमद्ये हे कारण आदळून येऊ शकते.

ताणतणाव : आजच्या जीवनातला ताणतणाव हे एक प्रमुख कारण पांढऱ्या केसांच्या वाढत्या जनसंख्येत आढळते .

रासायनिक पदार्थ : केसांची तेले, क्रीम्स, हेअरस्प्रे, साबण, शॅम्पू या मधील रासायनिक पदार्थांमुळे केस पांढरे होंऊ शकतात.व्यसने : मद्यप्राशन धूम्रपान ही व्यसने अनेक आजारांना कारणीभूत असतात केस पांढरे होण्यात सुद्धा त्यांचा हातभार असतो .

निद्रानाश : कोणत्याही कारणाने झोप नियमित ना मिळणे, सततची जागरणे, निद्रानाश अश्या कारणांचा समावेश ह्यात करावा लागेल.

रक्तातील कोलेस्टरचे प्रमाण खूप वाढत गेल्यास रक्तवाहिनीच्या मुळांशी त्यांचे थर जमा होऊ लागतात. त्यामुळे केस अकाली किंवा लवकर पांढरे होऊ शकतात.


या समस्येवर उपाय हवा ? केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासून वाचण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. त्याकरीता नियमित दिनचर्या, उचित वेळी केस धुणे, संतुलित आहार, व्यायाम, उत्तम झोप यांची आवश्यकता असते.

केस काळे राखण्यासाठी शरीराला प्रोटिन व्हिटॅमिन ए. बी. सी. डी. ई. कॅल्शिअम आयोडीन, फॉस्फोरस, खनिज क्षार, कार्बोहायड्रेट, आयर्न, कॉपर इ. पदार्थ पर्याप्त प्रमाणात मिळाले पाहिजेत.

व्हिटॅमिन व कॉम्लेक्समध्ये आढळणारे पॅन्टोर्थेनिक ऍसिड फॉलिक ऍसिड इ. पदार्थ केस काळे राखण्यात महत्वाची भुमिका बजावतात.

त्यामुळे, शरीराला सर्व द्रव्य योग्य प्रमाणात मिळण्याकरिता आहारात दूध, दही, लोणी, पनीर, अंडे, गाजर, मुळा, टोमॅटो, मटार, पालक, लिंबू, आवळा, खजूर, द्राक्षे, सफरचंद, मोसंबी, पालेभाज्या, ताजी फळे, अंकुरीत धान्ये आदिंचा समावेश करावा.
थोडे नवीन जरा जुने