शंभर आजारांवर एक गुणकारी फळ "मुळा" हे आहेत फायदे...


भाजी-भाकरीसोबत कांदा-मुळा खाण्याची सयव महाराष्ट्रात सर्रास आढळते. संतांच्या अभंगांमध्येही मुळ्याचा उल्लेख आवर्जून सापडतो. 

मुळा रंगाने पांढरा असतो. सॅलड म्हणून मुळा अधिक लोकप्रिय आहे. मुळ्याची भाजीदेखील करतात. सॅलड किंवा भाजी दोन्ही रूपात मुळा गुणकारी आहे. 


मुळ्यात प्रोटीन, कॅल्शियम, गंधक, आयोडिन आणि लोह भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. यात सोडियम, फॉस्फोरस, क्लोरिन आणि मॅग्नेशियमही असते. मुळ्यात अ जीवनसत्व , ब जीवनसत्त्व आणि क जीवनसत्त्वही पुरशा प्रमाणात असतात. 

मुळा हा जमिनीत वाढतो. मुळ्याची पाने जमिनीवर असतात. जमिनीवर वाढणा-या मुळ्याच्या पानांतही अनेक पोषक घटक असतात. साधारणपणे ही पाने फेकून देण्यात येतात. परंतु असे करणे योग्य नाही. मुळ्यासोबतच पानेही खाणे चांगले.

साधारणपणे लोकांचा कल जाडजूड मुळा खाण्याकडे असतो. परंतु आरोग्य आणि उपचाराच्या दृष्टीने बारीक मुळा खाणे अधिक चांगले. यामुळे वात, पित्त आणि कफ विकार दूर व्हायला मदत होते. याउलट जाडजूड मुळा खाणे त्रिदोषकारक आहे. मधुमेह, बवासीर आदी आजारांवर मुळा गुणकारी आहे.

रोज सकाळी उठल्यानंतर एक मुळा खात राहिल्यास कावीळ हा रोग दूर होतो. मुलींना मासिक पाळीत त्रास होत असेल तर रोज एक मुळा पानांसह खा. मुळ्याचा रस काढून त्यात लिंबाचा रस मिसळून चेह-याला लावल्यास चेहरा उजळतो. 

मुळ्याची पाने आणि बिया एकत्र वाटून त्वचारोग झालेल्या ठिकाणी लेप दिल्यास त्वचारोग दूर होतो. मुळ्यात पोषक घटक मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक आजार हे दूर राहतात.
थोडे नवीन जरा जुने