जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन केल्याने होऊ शकतात गंभीर आजार...


अति कॉफीमुळे शरीरात उत्साह निर्माण होत असला आणि उष्णता प्राप्त होत असली तरी त्यामधील चिवटपणा व कडूपणा याच्या दुष्परिणामामुळे उष्णतेचे विकार जडतात. 

हातापायांची, डोळ्यांची अग होणे, निद्रानाश, छातीत धडधडणे, पत्ताचे विकार वाढणे, वंध्यत्व निर्माण होणे असे अनेक विकार जडतात, म्हणून उष्ण प्रदेशातील लोकांनी कॉफीचे सेवन अजिबात करू नये, तसेच इतरांनीही रोजच कॉफी सेवन करू नये. 

कॉफी पेय तयार करताना त्यात साखर मिसळतात, त्यामुळे कॉफी शरीरास अजूनच घतक ठरते. कॉफी व साखरेच्या दुष्परिणामांमुळे लठ्ठपणा, हृदरोग, अति रक्तदाब, कॅल्शिअमची कमतरता असे अनेक विकार जडतात. 

कॉफीमध्ये असणा-या कॅफिनमुळे मांससपेशींवर व मज्जातंतूवर वाईट परिणम होतात. कॅफिन्मुळे आहार कमी प्रमाणात घेतला जातो. कारण त्यामुळे भूक मंदावते. वारंवार कॉफी घेतल्यामुळे लोह आणि कॅल्शिअमचे शरीरामध्ये शोषण होत नाही किंवा ते मूत्रावाटे बाहेर टाकले जाते. त्यामुळे अ‍ॅनिमिया व हाडांचा ठिसूळपणा आजार वाढीस लागतात.


क्वचित प्रसंगी थंडीपासून रक्षण करण्यासाठी एक बदल म्हणून अर्धा कप कॉफी प्यावी, त्यामुळे नक्कीच उत्साह वाढून ताजेपणा वाटेल; पण कॉफीचे वारंवार जास्त प्रमाणात सेवन केल्यास अस्वस्थपणा वाढून मानसिक ताण वाढतो. कारण कॅफिन हे एक प्रकारचे विषच आहे, त्यामुळे कॉफीचे दररोज सेवन टाळावे.
थोडे नवीन जरा जुने