वांग्यांची भाजी खात नाहीत ? मग तुम्ही या फायद्यापासून वंचित आहातया भाजीचं शास्त्रीय नाव सोलानम मेजाँजेना असं आहे. ही सोलानम प्रजातीतील वनस्पती आहे. या भाजीचं शास्त्रीय नाव सोलानम मेजाँजेना असं आहे. ही सोलानम प्रजातीतील वनस्पती आहे. मूळ उगम दक्षिण आशियातून आहे. या वनस्पतीची लागवड उष्ण कटिबंधात आणि समशितोष्ण कटिबंधात प्रामुख्याने केली जाते.

सर्वप्रथम चीनमध्ये वांगी वापरात आल्याचा उल्लेख आढळतो. इंग्रजीत याला एग एलिफंट किंवा ब्रिंजल असंही म्हटलं जातं. तर हिंदीत बैंगन असं म्हटलं जातं. लहान वांग्यांची भाजी केली जाते तर मोठय़ा वांग्याचं भरीत केलं जातं. इतकंच नाही तर लोणचंही केलं जातं.

वांग्याचे पांढरी आणि जांभळी असे दोन प्रकार आहेत. त्यातही काटेरी वांगी, भरताची वांगी किंवा भाजीची वांगी असेही प्रकार पडतात. वातकारी समजल्या जाणा-या वांग्याचे भरपूर गुणधर्म आहेत. पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, जीवनसत्त्व, खनिजं आणि फायबरने युक्त असलेल्या वांग्यांचे औषधी गुणधर्म जाणून घेऊयात.

फायबर, पोटॅशिअम, सी आणि बी-६ जीवनसत्त्व असल्यामुळे हृदयविकारापासून संरक्षण होतं.

वजन कमी करण्यास मदत करते.

 रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राखते.

 कॅन्सरपासून बचाव करते.

मेंदूला रक्तपुरवठा करून मेंदूचं कार्य सुरळीत करण्यास मदत करते.

 हाडं मजबूत करण्यास मदत होते.

लोहाचं प्रमाण अधिक असल्याने अ‍ॅनिमिय कंडिशन असणाऱ्यांनी वांग्यांची भाजी खावी.

फॉलिक अ‍ॅसिडचं प्रमाण अधिक असल्याने गरोदर महिलांनी याचं सेवन करावं.
थोडे नवीन जरा जुने