वाळवलेल्या अद्रकाचे सेवन केल्याने शरीरातील होतील 'हे' बदल !


स्वयंपाकघरात सतत वापरले जाणारे अद्रक किंवा आले ही बहुगुणी औषधी आहे. पदार्थांना चव आणण्याबरोबरच उपचारासाठी अनेक औषधी तयार करण्यासाठी अद्रक उपयोगी पडते. भारतात सर्वत्र त्याची लागवड केली जाते. 

जमिनीखाली येत असल्याने त्याचे कंद तयार होतात. अद्रक वाळवून,उकळून त्याची सुंठ तयार केली जाते. अद्रक तिखट रसाचे, पाचक, अग्निदीपक, मलसारक आहे.

जेवण्यापूर्वी आले खाल्ल्यास भूक वाढते. तोंडाची चवही चांगली होते. आम्लपित्त, पोटात दुखणे, गॅसेस होणे, नेहमी अजीर्ण होणे, भूक कमी लागणे अशा जुन्या तक्रारी असल्यास जेवणापूर्वी आले गुळाबरोबरच थोडे दिवस खावे.


नाहक गोष्टींचा ताण मनावर येत असेल तर रोज सकाळी अद्रक आणि मध एकत्रित घ्या.


पोट दुखत असल्यास चमचाभर आल्याचा रस पादेलोण, लिंबाचा रस घालून घ्यावा.


सांधे दुखत असल्यास सांध्यांना आल्याच्या रसात मीठ घालून चोळून घ्यावे.


दम्याचा त्रास होत असताना चमचाभर आल्याचा रस तूप साखरेसोबत घ्यावा.

सुंठीपासून बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ म्हणजे सुंठपाक. बाळंतिणीस कोणताही विकार होऊ नये, म्हणून तिला हा पदार्थ खायला दिला जातो. अशा स्त्रियांसाठी सुंठपाक अत्यंत गुणकारी असं औषध आहे. हा सुंठपाक स्त्रियांसाठी अत्यंत उत्तम असून स्त्रीचं वंध्यत्वही दूर करण्याची ताकद त्या पाकात आहे.
ताकात अद्रकाचे चूर्ण घालून प्यायल्याने मूळव्याधीच्या वेदना कमी होतात.


जुन्या सर्दीवरही सुंठेचं पाणी गुणकारी आहे. पिण्याच्या पाण्यात सुंठ घालून ते पाणी दीर्घकाळापर्यंत प्यावं लागतं. त्याने जुनी सर्दी बरी होते.
थोडे नवीन जरा जुने