आपली त्वचा तजेलदार राहावी असे वाटत असेल तर, बदल तुमच्या ह्या सवयी...


उन्हाळ्याचे दिवस म्हणजे त्वचेसाठी अवघड काळ,. सूर्याची उष्णता आणि वायुप्रदूषण यामुळे महिलांमध्ये त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्हाला वाटत असेल कि आपली त्वचा तजेलदार राहावी असे वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या काही सवयी बदलाव्या लागतील.


भरपूर पाणी प्या

जास्त तापामनामुळे शरीरात पाण्याची कमतरता तयार होते. ज्यामुळे आपल्याला डोकेदुखी आणि भोवळ येणे अश्या तक्रारी येणे सुरु होतात. यांच्यासोबतच आपल्या त्वचेवरचे तेज सुद्धा कमी होते. याच्यासाठी गरजेचे आहे की दिवसभरात कमीत कमी 10 ग्लास पाणी प्यावे आणि चहा, कॉफी पासून दूर रहावे.

झोपताना चेहऱ्यावर मेकअप नसेल याची काळजी घ्यावी.


उन्हाळ्यात मेकअप काढल्याशिवाय झोपण्याची चूक करू नका. अशाने चेहऱ्यावर धुळीचा घाण थर जमा होतो. आणि यामुळे चेहऱ्यावर फोड , मुरूम येण्याची शक्यता असते त्यामुळे आजपासून झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप स्वच्छ धुऊन काढावा. सनस्क्रीन लावायला विसरू नका.

त्वचा नेहमी मॉइस्चराइज असावी . तुमची त्वचा जितकी कोरडी असेल तेवढ्या लवकर सूर्याच्या किरणांचा आणि प्रदूषणाचा तुमच्या त्वचेवर परिणाम होईल. यामुळे आपल्या त्वचेची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी घरातून निघताना सनस्क्रीन लावायला विसरू नका.

त्वचा स्वच्छ करण्यासाठी क्लींजर वापरावे
आपला चेहरा साफ ठेवण्यासाठी नेहमी सौम्य क्लींजार वापरावे. याच्यासाठी जेल बेस क्लींजर किंवा शावर जेल क्लींजर सर्वोत्तम आहे. फक्त याच्या अतिवापराने त्वचेची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी.
थोडे नवीन जरा जुने