दीर्घायुषी होण्यासाठी तुम्हाला 'हि' गोष्ट करावीच लागेल....


कासव सात मिनिटातून एक श्वास घेतो आणि तो 300 हून अधिक वर्षे जगतो. त्याउलट कुत्र्याचे आहे.

आपल्या जीवनात श्वासाला खूप महत्त्व आहे. श्वास या शब्दाचा वापर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याने अंतिम श्वास घेतला असा करण्यात येतो. श्वास घेताना आपण प्राणवायू घेतो, त्याला विष्णुपदामृतही म्हटले जाते. एकूणच काय तर आपल्या जीवनात श्वास आणि उच्छवास याला अतिशय महत्त्व आहे. योग आणि प्राणायाम यामध्येही श्वासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्वास घेणे म्हणजे पूरक, सोडणे म्हणजे रेचक आणि रोखून ठेवणे म्हणजे कुंभक होय. 

असे म्हटले जाते की आपल्याला श्वास हे मोजूनच मिळालेले असतात. दीर्घायुष्य प्राप्त करायचे असेल तर श्वासावर नियंत्रण मिळवा असे योग आणि आयुर्वेदात सांगितले आहे. अधिक वर्षे जीवन जगणा-या प्राण्यांचा अभ्यास केल्यानंतर ध्यानात आले आहे की हळूवार श्वास घेणारे प्राणी अधिक वर्षे जगतात. कासव सात मिनिटातून एक श्वास घेतो आणि तो 300 हून अधिक वर्षे जगतो. त्याउलट कुत्र्याचे आहे. 

श्वास म्हणजे देवाने दिलेली बँक बॅलेन्स आहे. ती खर्च कशी करायची हे आपल्यावर अवलंबून आहे. नियमित प्राणायामामुळे आपल्या श्वासाची गती हळू हळू कमी होऊ लागते. आपण दीर्घ श्वास घ्यायला शिकतो. प्राचीन ऋषी मुनी म्हणून तर अधिक वर्षे जीवन जगत होते.
थोडे नवीन जरा जुने