अतिरिक्त चरबी वाढण्यामागे 'हि' आहेत कारणे, दिनचर्येत करा 'हा' छोटासा बदल !


हल्ली तरुणांमध्ये स्थूलतेचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचं मुख्य कारण आहे शरीरात वाढत जाणारी चरबी. चरबी म्हणजेच मेद. चरबी वाढल्यामुळे शरीराचं वजन वाढतं. उंचीच्या तुलनेत वजन वाढल्यास व्यक्ती लठ्ठ म्हणून ओळखली जाते. खालील गोष्टींमुळे चरबी वाढते.

चयापचयाचा त्रास.

वाताचे आजार.

तेलकट, तुपकट, गोड, काबरेहायड्रेट्सयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाणं.

दिवसा झोपणं.

व्यायामाबद्दल अनास्था.

बैठी कामं करण्याची जीवनशैली.

अनुवंशिकता.

वजन वाढल्यामुळे होणारे त्रास

सतत भूक आणि तहान लागणं.

सतत घाम येणं. घामाला दरुगधी येणं.

काहीही केल्यास दम लागणं.

अंगदुखी.

निराशा येणं.

उपाय

व्यायाम : 

चालण्यासारखा योग्य व्यायाम नाही. या व्यायामामुळे वजन आटोक्यात राहतं. जीममध्ये जाण्यापेक्षा मोकळया हवेत चालण्याचा व्यायाम करावा.

झोप : 

उत्तम आरोग्यासाठी समतोल आहार आणि व्यायाम तर हवाच. पण याच्या जोडीने दररोज रात्री सात ते आठ तासांची झोप घ्यावी.

हसा : 

जास्तीत जास्त हसणारा माणूस हा तंदुरुस्त राहू शकतो. हे शास्त्रज्ञांनीही सिद्ध केलं आहे. चिंतेत राहण्यापेक्षा हसणं कधीही चांगलं. चिंतेमुळे अधिकाधिक रोग जडतात. चिंतेमुळे हार्मोन्सही अत्यंत कमी प्रमाणात स्त्रवतात.

रेड वाईन : 

द्राक्षांपासून तयार करण्यात आलेली ही रेड वाईन शरीरातील एचडीएल कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवते. हे एचडीएल कोलेस्टेरॉल शरीरात चरबी वाढू देत नाही.
थोडे नवीन जरा जुने